शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
4
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
5
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
6
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
7
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
8
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
9
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
10
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
11
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
12
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
13
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
14
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
15
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
16
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
17
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
18
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
19
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
20
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 06:21 IST

कंपनीच्या संचालकांनी अधिकाऱ्याची तक्रार केल्यानंतर  सीबीआयने सापळा रचून अगरवालला लाचेचा पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपये स्वीकारताना अटक केली. 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एका खासगी कंपनीच्या लेखा परीक्षणादरम्यान कंपनीला ९८ लाखांचा कर लावण्याची धमकी देत ते प्रकरण मिटवण्यासाठी २० लाख रुपयांची लाच मागणाऱ्या केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या (सीजीएसटी) अधीक्षकाला सीबीआयने मुंबईत अटक केली. अंकित अगरवाल असे त्याचे नाव आहे.  

संबंधित कंपनीच्या संचालकांनी अधिकाऱ्याची तक्रार केल्यानंतर  सीबीआयने सापळा रचून अगरवालला लाचेचा पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपये स्वीकारताना अटक केली. 

घरात १८ लाखांची रोकड अटक केल्यानंतर सीबीआयने या अधीक्षकाच्या निवासस्थानी छापेमारी केली. असता त्याच्याकडे १८ लाख ३० हजारांची रोकड, ४० लाख रुपयांच्या आणि ३२ लाख रुपयांच्या मालमत्तांची कागदपत्रेही आढळली. सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीचे लेखा परीक्षण करताना अगरवालने कंपनीच्या संचालकाला आपण कंपनीला ९८ लाख रुपयांच्या कराची नोटीस जारी करत असल्याचे सांगितले. तसेच, हे प्रकरण मिटवण्यासाठी २० लाख रुपयांची लाच मागितली. मात्र, तडजोडीअंती लाचेची रक्कम १७ लाख रुपये निश्चित करण्यात आली. 

English
हिंदी सारांश
Web Title : GST Superintendent Arrested Taking Bribe; CBI Uncovers Wealth

Web Summary : A CGST superintendent in Mumbai was arrested by the CBI for demanding a ₹20 lakh bribe to settle a tax audit matter. He was caught accepting ₹5 lakh. Raids at his residence revealed ₹18.3 lakh in cash and property documents worth lakhs.
टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण