शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

४० हजारांची लाच घेताना ग्रामसेवकास पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 21:12 IST

बुधवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ४० हजारांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी चारथळ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

चांदूर रेल्वे (अमरावती) : तालुक्यातील पळसखेड येथील ग्रामविकास अधिकारी प्रमोद नारायण चारथळ (५०, रा. विष्णूनगर, नवसारी, अमरावती) याला बुधवारी चांदूर रेल्वे तहसील कार्यालय परिसरात ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडण्यात आले.प्राप्त माहितीनुसार, पळसखेड ग्रामपंचायत येथे एल.ई.डी. पथदिव्यांच्या कामांचे एम.बी. बूक जिल्हा परिषदेकडे पाठविणे व त्या कामाचा धनादेश सोपविण्यासाठी ग्रामविकास अधिकारी प्रमोद चारथळ याने तक्रारदारास रकमेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने २५ सप्टेंबर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. ७ आॅक्टोबर रोजी पडताळणी करण्यात आली. यावेळी चारथळ याने एक लाखाची मागणी केली. तडजोडअंती ४० हजार रुपयांची रक्कम देण्याचे ठरले. १८ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीच्या आधारे चांदूर रेल्वे तहसील कार्यालयात सापळा रचला. बुधवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ४० हजारांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी चारथळ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. यानंतर चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन, पोलीस हवालदार चंद्रशेखर दहीकर, सुनील व-हाडे, युवराज राठोड, पोलीस शिपाई, अभय वाघ, महेंद्र साखरे, चालक चंद्रकांत जनबंधू यांनी पार पाडली.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारी