शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

१००० कोटींचा घोटाळा; आरोपी नसूनही EOW करणार गोविंदाची चौकशी, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 19:20 IST

आर्थिक गुन्हे शाखेचं पथक गोविंदाच्या चौकशीसाठी मुंबईत येणार असल्याचीही माहिती

Govinda Crime EOW Interrogation : बॉलिवूडचा हसतमुख अभिनेता गोविंदा याने ९० चे दशक गाजवले. कुली नंबर १ पासून ते हिरो नंबर १ सारख्या तुफान विनोदी आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांतून गोविंदा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. त्याने आपल्या अभिनयासोबतच हटके डान्सच्या बळावर रसिकांची मनं जिंकली. मात्र सध्या याच 'हिरो नंबर १' साठी धडकी भरवणारी एक बातमी आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून कोट्यवधींच्या घोटाळ्या प्रकरणी गोविंदाची चौकशी करणार असल्याचे सांगितले जात आहे.

नक्की प्रकरण काय?

आर्थिक गुन्हे शाखेकडून 1000 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी चित्रपट अभिनेता गोविंदाची चौकशी केली जाणार आहे. ओडिशाच्या गुन्हे शाखेकडून ही चौकशी केली जाईल. अहवालानुसार, सोलर टेक्नो अलायन्स (STA-Token) ने कथितपणे क्रिप्टो गुंतवणूक उपक्रमाद्वारे बेकायदेशीर पोंझी योजना चालवली. या कंपनीचे जगातील अनेक देशांमध्ये ऑनलाइन अस्तित्व आहे. या योजनेद्वारे कंपनीने भारतातील अनेक शहरांमध्ये 1000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

गोविंदाचा या प्रकरणाशी संबंध काय?

ऑनलाइन पॉन्झी योजनेद्वारे, कंपनीने सुमारे 1000 कोटी रुपये 2 लाखांहून अधिक लोकांकडून अनधिकृत पद्धतीने जमा केले. रिपोर्टनुसार, गोविंदाने या कंपनीचे प्रमोशन केले होते. त्याने कंपनीसाठी प्रमोशनल व्हिडिओही बनवले. याबाबत अधिक माहिती गोळा करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी गोविंदाच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. मात्र, या प्रकरणात गोविंदा आरोपी किंवा संशयित नाही. ईओडब्ल्यूचे अधिकारी लवकरच मुंबईला चौकशीसाठी जाणार आहेत.

तर गोविंदाला साक्षीदार करणार!

टीओआयच्या रिपोर्टनुसार, EOW इंस्पेक्टर जनरल जेएन पंकज यांनी सांगितले आहे की ते लवकरच मुंबईला एक टीम पाठवतील. ती टीम या प्रकरणात गोविंदाची चौकशी करेल. त्यांनी सांगितले की गोविंदाने जुलैमध्ये गोव्यात झालेल्या एसटीएच्या भव्य कार्यक्रमात भाग घेतला होता आणि काही व्हिडिओंमध्ये कंपनीची जाहिरात केली होती. महानिरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, सध्या गोविंदा या प्रकरणात आरोपी नाही किंवा त्याच्यावर संशयही नाही. मात्र, चौकशी झाल्यावरच या प्रकरणातील आपली भूमिका स्पष्ट होईल, असे त्यांनी निश्चितपणे सांगितले आहे. गोविंदा या प्रकरणात केवळ प्रसिद्धीपुरता मर्यादित असेल तर त्याला साक्षीदार बनवता येईल.

पोन्झी योजना काय होती?

या फसव्या कंपनीने भद्रक, केओंझार, बालासोर, मयूरभंज आणि भुवनेश्वर येथील सुमारे 10 हजार लोकांकडून 30 कोटी रुपये उकळले. याशिवाय बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, आसाम, मध्य प्रदेश आणि झारखंड या राज्यांमध्येही लोकांना फसवून पैसे घेण्यात आले. कंपनी लोकांना गुंतवणूक करण्यास सांगायची आणि गुंतवणूकदारांना त्यांच्यासोबत इतर लोकांना जोडण्यास सांगायची. लोक सामील झाल्यास प्रोत्साहन देण्याचे आश्वासनही दिले जायचे.

टॅग्स :GovindaगोविंदाEconomic Offence Wingआर्थिक गुन्हे शाखाfraudधोकेबाजीOdishaओदिशा