शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हत्येचा तपास एटीएसकडे; तब्बल सात वर्षे उलटल्यानंतर निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 06:37 IST

एटीएसतर्फे ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी सीआयडीला हा तपास एटीएसकडे वर्ग करण्यास काहीही हरकत नसल्याचे न्यायालयाला सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला सात वर्षे उलटल्यानंतर उच्च न्यायालयाने हा तपास सीआयडीकडून महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) बुधवारी वर्ग केला आहे. 

आतापर्यंत पानसरे हत्येचा तपास सीआयडीने स्थापन केलेले विशेष तपास पथक (एसआयटी) करत होते. ‘एसआयटीला तपासात यश आले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग करावा,’ अशी विनंती करणारा अर्ज पानसरेंच्या कुटुंबीयांकडून ॲड. अभय नेवगी यांच्याद्वारे गेल्या महिन्यात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता. बुधवारी झालेल्या सुनावणीत न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. शर्मिला देशमुख यांनी पानसरे कुटुंबीयांनी केलेला अर्ज मंजूर करत तपास एसआयटीकडून एटीएसकडे वर्ग केला.

एटीएसतर्फे ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी सीआयडीला हा तपास एटीएसकडे वर्ग करण्यास काहीही हरकत नसल्याचे न्यायालयाला सांगितले. ‘एटीएससुद्धा राज्य सरकारची तपास यंत्रणा आहे. पानसरे हत्येचा तपास एटीएसकडे वर्ग करण्यावर आक्षेप नसून, आम्ही सहमत आहोत. तपासादरम्यान एसआयटीचे काही अधिकारी एटीएसला सहकार्य करतील,’ असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा अद्यापही छडा लागत नसल्याने सर्वच क्षेत्रांतून सरकार आणि पोलिसांबाबत नाराजी व्यक्त होत होती. 

दाभोलकर कुटुंबीय, मेधा पाटकर हिटलिस्टवरn पानसरे यांच्या हत्येमागील खरा सूत्रधार कोण आहे, हे अद्याप समजले नाही. एसआयटीच्या म्हणण्यानुसार, पानसरे यांच्या हत्येमागे ज्यांचा हात आहे, त्यांच्या हिटलिस्टवर ४० जण आहेत. n त्यामध्ये दाभोलकर कुटुंबीय आणि मेधा पाटकर यांचाही समावेश आहे. n त्यामुळे मास्टरमाइंडला अटक व्हावी, हीच इच्छा असल्याचे नेवगी यांनी सांगितले. आरोपींच्या अर्जाला विरोधn तपास वर्ग करण्याविरोधात या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रांत भावे व शरद कळसकर यांनी न्यायालयात अर्ज केला. n मात्र, मुंदरगी आणि नेवगी यांनी या अर्जाला विरोध केला. न्यायालयानेही त्यांच्या अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला.

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरे