शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खुर्चीखाली लपवून आणलं सोनं, दिल्लीहून आलेल्या प्रवाशाला घेतले ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 17:18 IST

Gold Smuggling : गोव्यात येण्यापूर्वी दुबईहून दिल्लीला आलेल्या या विमानातील एका प्रवाशाने प्रथम हे तस्करीचे सोने खुर्ची खाली लपवून आणले होते.

ठळक मुद्देयाप्रकरणात कस्टम कायद्याखाली तस्करीचे सोने जप्त करण्यात आलेले असून त्या प्रवाशाला अटक केल्याची माहीती कस्टम सूत्रांनी दिली. कस्टम अधिकारी याप्रकरणात अधिक तपास करीत आहेत.

वास्को: गोव्याच्या दाबोळी विमानतळावर नवी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाला कस्टम विभागाने ताब्यात घेऊन त्याच्याकडून २ कीलो १७० ग्राम तस्करीचे सोने जप्त केले. हे विमान प्रथम दुबईहून दिल्लीला येत असताना एका प्रवाशाने तस्करीचे सोने विमानातील प्रवासी खुर्ची खाली लपवून ठेवले होते. विमान दिल्लीतून गोव्यासाठी येण्याकरिता निघण्यापूर्वी तस्करी करणाऱ्या या गटाचा दुसरा साथिदार विमानात चढून तो हे सोने गोव्यात आणण्याचा प्रयत्न करत होता, मात्र दाबोळीवरील जागृत कस्टम अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे त्याचा हा बेत फसला.

दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार शनिवारी (दि.२३) ही कारवाई करण्यात आली. दिल्लीहून दाबोळीवर येणाऱ्या विमानातून प्रवासी तस्करीचे सोने आणणार असल्याची माहीती कस्टम अधिकाऱ्यांना पूर्वीच प्राप्त झाली होती. यामुळे त्यांनी येथील सर्व हालचालीवर कडक नजर ठेवली होती. दिल्लीहून आलेल्या विस्तारा (युके ८४७) विमानातील एका प्रवाशावर कस्टम अधिका ऱ्यां ना दाट संशय निर्माण झाला. त्याची येथे कसून तपासणी केली असता त्याच्याकडून विदेशी सोन्याच्या बिस्कीट आढळल्या. त्या प्रवाशाकडून अधिकाºयांनी जप्त केलेल्या सोन्याचे वजन २ कीलो १७० ग्राम असून याची किंमत ९५ लाख ३ हजार रुपये असल्याची माहीती कस्टम सूत्रांनी दिली. तस्करीच्या सोन्यासहीत सापडलेल्या याप्रवाशाशी अधिकाºयांनी कसून चौकशी केली असता तो मूळ पच्छीम बंगाल चा असल्याचे स्पष्ट झाले. दाबोळीवर उतरण्यापूर्वी हे विमान दुबईहून दिल्लीला आले असता त्यात प्रवास करणाºया एका प्रवाशाने तस्करीचे सोने विमानातील एका खुर्चीखाली लपवून ठेवल्याची माहीती अधिकाऱ्यांना तपासणीवेळी प्राप्त झाली. नंतर ताब्यात घेण्यात आलेला हा प्रवासी दिल्लीत त्या विमानात चढून विमान दाबोळीवर उतरल्यानंतर तो हे तस्करीचे सोने बाहेर काढून पलायन करण्याच्या प्रयत्नात होता, मात्र येथे झालेल्या कारवाईमुळे त्याचा बेत फसला. याप्रकरणात कस्टम कायद्याखाली तस्करीचे सोने जप्त करण्यात आलेले असून त्या प्रवाशाला अटक केल्याची माहीती कस्टम सूत्रांनी दिली. कस्टम अधिकारी याप्रकरणात अधिक तपास करीत आहेत.

९ महिन्यात दाबोळीवर जप्त केले १ कोटी ११ लाख रुपयांचे तस्करीचे सोनेदाबोळी विमानतळावर एप्रिल २०२० ते आत्तापर्यंत कस्टम अधिकाऱ्यांनी कारवाई करून १ कोटी ११ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केल्याची माहीती कस्टम सूत्रांकडून प्राप्त झाली. याकाळात कारवाई करून जप्त केलेल्या तस्करीच्या सोन्याचे एकूण वजन २ कीलो ५१५ ग्राम असल्याची माहीती त्यांनी दिली.  

टॅग्स :GoldसोनंSmugglingतस्करीAirportविमानतळgoaगोवा