शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी देणे पडले असते महागात; गोळीबार प्रकरणी गुन्ह्यासाठी झाला असता वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 01:23 IST

गोळीबाराच्या घटनेनंतर वरिष्ठ निरीक्षक प्रदीप तिदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले होते.

नवी मुंबई : गोळीबार प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने मित्राची दुचाकी वापरली होती. ही दुचाकी घेऊन तो हत्येच्या उद्देशाने चालला होता. मात्र त्यापूर्वीच अपघात झाल्याने त्याला दुचाकी देणाऱ्या मित्रापुढील कायदेशीर अडचणी टळल्या आहेत.मित्राच्या मोटरसायकल वरून तो मद्यधुंद अवस्थेत नातेवाइकाचा काटा काढण्याच्या उद्देशाने चालला होता. त्यापूर्वीच किरकोळ अपघात झाल्याने रागाच्या भरात त्याने अपघाताच्या ठिकाणीच गोळीबार करून पळ काढला. अन्यथा ज्या व्यक्तीचा काटा त्याला काढायचा होता, त्याच्यावर गोळी झाडण्यात तो यशस्वी झाला असता. अशावेळी त्याने गुन्ह्यासाठी वापरलेल्या दुचाकीमुळे त्याचा मित्र कायद्याच्या कचाट्यात आला असता.

गोळीबाराच्या घटनेनंतर वरिष्ठ निरीक्षक प्रदीप तिदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले होते. त्यात निरीक्षक गजानन कदम, नीलेश येवले, नीलेश धुमाळ, राजरत्न खैरनार, हवालदार गणपत पवार, दिनेश पाटील, विकास निकम, राकेश पाटील, गणेश चौधरी, किरण बुधवंत, शंकर भांगरे, गणेश गिते आदींचा समावेश होता. त्यांनी करकेरा याने वापरलेल्या दुचाकीचा शोध घेण्यावरच भर दिला होता. यासाठी त्याने मार्गावरील सीसीटीव्ही तपासले. यादरम्यान त्याला देशी दारूची सवय असल्याची माहिती वाशीतील बारमधून पोलिसांना मिळाली. यावरून त्याला कोपरखैरणेतून अटक करण्यात आली. त्यापूर्वी दुचाकीचा सुगावा लागला असता तर त्या मित्रापुढील अडचणीत वाढ झाली असती.

रागाच्या भरात गोळीबार केल्याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी रुपेश करकेरा (३५)ला अटक केली. न्यायालयाने त्याला २१ मार्च पर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे. चौकशीत त्याने मित्राची मोटरसायकल तात्पुरती वापरण्यासाठी घेतली होती अशी कबुली दिली आहे.

टॅग्स :Policeपोलिस