शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरानं दुखावल्यामुळं प्रेयसीचा गळफास; मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला भयानक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 13:00 IST

प्रियकरानं दिलेल्या वागणुकीनं प्रेयसी खुप दुखावली गेली. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत या जगाचा अखेरचा निरोप घेतला.

पश्चिम बंगालच्या उत्तर परगना जिल्ह्यात एक ह्द्रयद्रावक घटना घडली आहे. अनेक काळ एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. दोघंही एकत्र राहायचे. घरीच प्रियकरानं प्रेयसीशी भांगेत कुंकू भरलं. परंतु अचानक एकेदिवशी प्रियकरानं प्रेयसीला म्हातारी दिसत असल्याचं म्हटलं. त्यानंतर तिच्याशी बोलणं कमी केले. प्रियकराच्या अशा वागण्याने प्रेयसीला धक्का बसला. तिने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु प्रियकरानं तिला काहीच उत्तर दिलं नाही.

प्रियकरानं दिलेल्या वागणुकीनं प्रेयसी खुप दुखावली गेली. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत या जगाचा अखेरचा निरोप घेतला. बनगावच्या छायाघरिया गावातील ही दुर्दैवी घटना आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलीचं वय २५ वर्ष आहे. नातेवाईकंच्या म्हणण्यानुसार, रियाचे काही वर्षापासून परिसरातच राहणाऱ्या सूरज विश्वास नावाच्या मुलाशी संबंध होते. या दोघांची सुरुवातीला मैत्री झाली त्यानंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. सूरजनं रियाला प्रेमाची मागणी घातली. त्याला प्रेयसीनं होकार दिला. त्यानंतर हळूहळू त्यांचं नातं फुलत गेले. या दोघांमधील अंतर खूप कमी झालं होतं. रियानं तिच्या फेसबुक पोस्टवर याबाबत पोस्ट केले आहे.

सूरजचे अन्य मुलीसोबत संबंध असल्याचं रियाला माहिती पडलं. त्यानंतर सूरजनं रियाला म्हातारी असल्याचं म्हटलं. सूरज आणि रियाच्या नात्यात कुटुंबीयांनी विरोध केला. मात्र सूरजच्या वागण्यानं रिया मनाने पूर्ण कोसळली होती. सूरजला समजवण्याचा प्रयत्न केला तरी त्याने रियाशी बोलणं सोडलं. रिया सूरजला तिचा पती मानत होती. परंतु सूरजला तिच्याशी संबंध ठेवायचे नव्हते. सूरजनं रियापासून दूर जायचं ठरवलं होतं. सूरजला रियाच्या नातेवाईकांनीही समजावलं परंतु त्याने रियाशी लग्न करायचं नाही हे ठाम सांगितले.

प्रियकराच्या वागण्यानं प्रेयसी दुखावली

सूरजच्या वागण्यानं रियाचं मन दुखावलं होतं. रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर रिया तिच्या खोलीत झोपण्यासाठी गेली. त्यावेळी अचानक जोरदार आवाज आला. कुटुंबातील सदस्याने रियाच्या रुमकडे धाव घेतली तेव्हा रिया तिच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. मोबाईल पुढे पडला होता. मोबाईलवर व्हिडीओ सुरू होता. सर्व घटना व्हिडीओत कैद झाली. रियाने गळ्यात फास लावला होता. कुटुंबातील सदस्याने रियाला उतरवून तात्काळ हॉस्पिटलला नेले परंतु त्याठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रियाच्या अशा जाण्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यानंतर त्यांनी सूरजविरोधात तक्रार नोंदवली असून सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.