शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

पतीच्या शोधात असलेल्या महिलेला फकीर बाबाने घातला गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 21:03 IST

पवई परिसरात नेहा (नावात बदल) पती आणि ६ वर्षांच्या मुलासोबत राहतात. १२ नोव्हेंबर रोजी पती घर सोडून निघून गेले. पती कुठे गेले? याचा शोध सुरू होता. १५ तारखेला सकाळी त्या शेजारच्या महिलेला पतीबाबत सांगत असताना, एक फकीर तेथे धडकला.

ठळक मुद्दे १२ नोव्हेंबर रोजी पती घर सोडून निघून गेले. पती कुठे गेले? याचा शोध सुरू होता. शेजारच्या महिलेला पतीबाबत सांगत असताना, एक फकीर तेथे धडकला. त्याने नेहा यांना चिंतेचे कारण विचारले. त्याच्याकडे दिलेले नारळ फोडताच त्यातून लाल रंगाचे पाणी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्यांचे तुकडे निघाल्याचे महिलेने पाहिले. तिचा बाबावरचा विश्वास वाढला.

मुंबई - बेपत्ता पतीचा शोध घेणाऱ्या महिलेचे दागिने एका फकीर बाबाने लुटल्याची घटना पवईमध्ये घडली आहे. या प्रकरणी रविवारी पवई पोलिसांनी फकीर बाबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पवई परिसरात नेहा (नावात बदल) पती आणि ६ वर्षांच्या मुलासोबत राहतात. १२ नोव्हेंबर रोजी पती घर सोडून निघून गेले. पती कुठे गेले? याचा शोध सुरू होता. १५ तारखेला सकाळी त्या शेजारच्या महिलेला पतीबाबत सांगत असताना, एक फकीर तेथे धडकला. त्याने नेहा यांना चिंतेचे कारण विचारले.तिने पती बेपत्ता झाल्याचे सांगताच, फकिराने त्यांच्या हातावर चुना लावला. त्यावर पाणी ओतताच पाणी गुलाबी झाले. पुढे त्याच्याकडे दिलेले नारळ फोडताच त्यातून लाल रंगाचे पाणी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्यांचे तुकडे निघाल्याचे महिलेने पाहिले. तिचा बाबावरचा विश्वास वाढला. तेव्हा, फकिराने पती एका महिलेच्या नदी लागल्याचे सांगून उद्या येऊन उपाय सांगतो असे सांगितले. १६ तारखेला सकाळी बाबाने सांगितल्याप्रमाणे नेहाचे घर गाठले. बाबाने त्याच्याकडील चार खिळे दिले व घराच्या चार कोपऱ्यांमध्ये पेपरमध्ये ठेवण्यास सांगितले. तसेच पाटील सोन्याचे पाणी पाजल्यानंतर तो व्यवस्थित होईल आणि पुढे कधीच घर सोडून जाणार नाही असे सांगितले. त्यानुसार, महिलेने अंगावरील दागिने काढून बाबाकडे दिले. त्यात पीठ टाकून, मडके कपड्याने गुंडाळून सायंकाळी उघडण्यास सांगितले. त्याआधी उघडल्यास पती आणि मुलगा मरण पावतील अशी भीती घालून बाबा निघून गेला. सायंकाळी ५ नंतर तिने मडके उघडून बघितले असता त्यात दागिने नव्हते.  सीसीटीव्ह फुटेजसह गाठले पोलीस ठाणे महिलेने परिसरात बाबाचा शोध सुरू केला. तेव्हा, १७ तारखेला एका कार्यालयाच्या सीसीटीव्हीमध्ये बाबा कैद झालेला दिसला. तिने हे फूटेज घेऊन १८ रविवारी पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगून तक्रारतक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या फुटेजच्या आधारे फकीर बाबाचा पोलीस शोध घेत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी