शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

वर्गामध्ये अचानक एका पाठोपाठ एक ११ मुली पडल्या बेशुद्ध; कारण ऐकून धक्काच बसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 16:36 IST

कोतवाली परिसरातील किंग जॉर्ज इंटर कॉलेजमध्ये वर्गात शिकताना अचानक मुली बेशुद्ध पडू लागल्या.

बाराबंकी - उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात एका शाळेच्या ११ विद्यार्थिनी अचानक बेशुद्ध पडल्या त्यातील ४ जणींची तब्येत गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. वर्गात शिकताना एका पाठोपाठ एक मुलगी बेशुद्ध पडली. त्यानंतर या मुलींना तातडीने लखनौच्या ट्रामा सेंटरला उपचारासाठी नेले. या शाळेच्या संरक्षक भिंतीशेजारी असलेल्या स्मशान भूमीत भंगारवाल्याकडून काही औषधे जाळण्यात आली. त्यामुळे विषारी वायू निर्माण झाला. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली परिसरातील किंग जॉर्ज इंटर कॉलेजमध्ये वर्गात शिकताना अचानक मुली बेशुद्ध पडू लागल्या. एका पाठोपाठ एक अशा ११ मुली बेशुद्ध झाल्या. काही शिक्षकही चक्कर येऊन कोसळले. या घटनेत जवळपास १५-२० लोकांची तब्येत बिघडली. या घटनेने खळबळ माजली. तात्काळ शाळा प्रशासनानं स्थानिक रुग्णालयात या सर्वांना उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहचले. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयित युवकाला अटक केली आहे. 

४ मुलींची तब्येत गंभीर घटनास्थळी पोहचलेल्या पोलीस अधिकारी नवीन कुमार सिंह यांनी तात्काळ शाळा आणि आसपासचा परिसर सील केला. विद्यार्थ्यांची तब्येत ढासळत असल्याचं पाहताच त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. त्यानंतर ४ गंभीर विद्यार्थिंनीना लखनौच्या ट्रामा सेंटरला उपचारासाठी नेले. सध्या अफजा सिद्दीकी, नाजिया अंसारी, पलक, मानवी यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत. तर खुशी गुप्ता, अंशिका तिवारी, इमरा, असलान अली, अंशिका वर्मा, मोहम्मद जमील यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 

या घटनेबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, अचानक दुर्गंधीचा वास येऊ लागल्याने सुरुवातीला काहीच समजले नाही. त्यानंतर जेव्हा आम्ही याचा शोध घेतला तेव्हा भंगारवाल्याने काही औषधे जाळली होती. ज्यामुळे विषारी वायू निर्माण झाला. त्यामुळे अनेक बेशुद्ध पडले असं त्यांनी म्हटलं. तर शाळेत वर्गात शिकताना अचानक दुर्गंध आला. त्यामुळे आम्हाला श्वासही घेता येत नव्हता. उलटी आली. सर्व दहशतीचं वातावरण होतं. वर्गात गोंधळ उडाला होता असं पीडित विद्यार्थिनीने सांगितले.