शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

एकाचवेळी दोघींसोबत लिव्ह इनमध्ये राहिला, पहिलीला फिरण्यासाठी कुल्लूला नेलं, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 10:13 IST

युवतीचा शोध घेत घेत सात महिने उलटले तरी पोलिसांना तिचा शोध लागला नाही. या कालावधीत युवकानं पोलिसांनी अनेकदा दिशाभूल केली.

गाजियाबाद - उत्तर प्रदेशातील गाजियाबाद इथं वसुंधरामध्ये हैराण करणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी एक युवक दोन युवतींसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. या दोघींना त्याने वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याने घेतलेल्या घरी ठेवले होते. एकेदिवशी पहिल्या युवतीला दुसऱ्या युवतीबाबत माहिती पडलं. तिने याला विरोध केला तेव्हा आरोपी युवकानं फिरण्याच्या बहाण्याने तिला हिमाचलला घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने २ वर्षाच्या मुलीसमोरच युवतीचा गळा दाबून मारून टाकलं. 

त्यानंतर आरोपी युवकाने दरीत युवतीचा मृतदेह ढकलला आणि तिथून पळ काढला. युवकानं दुसऱ्या युवतीसोबत लग्न करून असं राहू लागला जसं काहीच झालं नाही. ही घटना ७ महिन्यापूर्वीची आहे. पोलिसांनी मृत युवतीची बेपत्ता नोंद घेत तपास सुरू केला. त्यावेळी संशयाच्या आधारे पोलिसांनी युवकाची चौकशी केली. सुरुवातीला पोलिसांची आरोपीने दिशाभूल केली. परंतु खाकीचा धाक दाखवताच आरोपी युवकाने गुन्ह्याची कबुली दिली. 

पोलिसांनी सांगितले की, भोपुरा इथं आरोपी रमन गॅरेजमध्ये काम करायचा. मे महिन्यात त्याने त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीची कुल्लू इथं गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह दरीत फेकून दिला. त्याठिकाणाहून परतल्यानंतर आरोपीने स्वत: पोलिसांकडे जात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. युवतीचा शोध घेत घेत सात महिने उलटले तरी पोलिसांना तिचा शोध लागला नाही. या कालावधीत युवकानं पोलिसांनी अनेकदा दिशाभूल केली. त्यानंतर आरोपीच्या जबाबावर युवतीच्या आईला संशय झाला. त्यानंतर पोलिसांनी या युवकाला खाकीचा धाक दाखवत चौकशी केली तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 

दुसऱ्या मुलीशी लग्न करण्यासाठी केली हत्याआरोपीने पोलिस चौकशीत सांगितले की, मी दोन मुलींसोबत लिव्ह इनमध्ये राहत होतो. ३ मे रोजीच मी दुसऱ्या मुलीशी लग्न केले होते. मात्र मृत मुलीला हा प्रकार कळला आणि तिने विरोध सुरू केला. अशा स्थितीत तब्बल १५ दिवसांनी फिरण्याच्या बहाण्याने मी तिला हिमाचलला नेले आणि गळा आवळून खून केला. त्यावेळी मयत मुलगी तीन महिन्यांची गरोदर होती. तिला आधीच दोन वर्षांची मुलगी होती. आरोपीने  मुलीसमोरच हा प्रकार घडल्याचे सांगितले.

मोबाईलच्या लोकेशनवरून उघड झाले रहस्यपोलिसांनी मुलीच्या मोबाईलची माहिती विचारली, मात्र आरोपी रमणने असे उत्तर दिले की ज्याने पोलिसांनाही संशय आला. यानंतर पोलिसांनी मोबाईलचे लोकेशन आणि कॉल डिटेल्स काढले. यामध्ये मुलीच्या फोनचा शेवटचा कॉल कुल्लू या लोकेशनचा असल्याचे आढळून आले. त्यावेळी रमणच्या मोबाईलचे लोकेशनही तेच होते. यानंतर पोलिसांनी त्याच्या फ्लॅटच्या आजूबाजूला १७ मेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये आरोपीसह तरुणी कारमध्ये बसलेली दिसली. संशय बळावत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले.