शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीत चिमुरड्याची अज्ञातांकडून हत्या; घरालगतच गोणीत आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 23:49 IST

ओमकार साठे (४) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. तो घणसोली गाव येथील बाळाराम वाडीमध्ये राहायला होता. त्याचे वडील रंगकाम कामगार असून, त्यांना ओमकारपेक्षा मोठ्या दोन मुली आहेत.

नवी मुंबई : चार वर्षीय मुलाची हत्या झाल्याची घटना घणसोली येथे शुक्रवारी घडली आहे. हा मुलगा खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्याने त्याचा शोध सुरू होता. यावेळी घरालगतच गोणीत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमागे त्याच ठिकाणी दिवस-रात्र वावर असलेल्या गर्दुल्ल्यांवर संशय व्यक्त केला जात आहे.ओमकार साठे (४) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. तो घणसोली गाव येथील बाळाराम वाडीमध्ये राहायला होता. त्याचे वडील रंगकाम कामगार असून, त्यांना ओमकारपेक्षा मोठ्या दोन मुली आहेत. शुक्रवारी शंकर हे कामावर गेले असता, त्यांची पत्नी व मुले घरी होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ओमकार हा घराबाहेर खेळत होता. या दरम्यान तो एकदा घरी येऊन गेला, परंतु त्यानंतर तो पुन्हा घरी न आल्याने आईने शोधाशोध केली असता, पायऱ्यांवर त्याच्या चिखलाने भरलेल्या पायाचे ठसे दिसून आले. यावरून त्याला पायऱ्यांवरून उचलून नेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ओमकार अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी व परिसरातील नागरिकांनी शोधाशोध केली. अखेर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरापासून काही अंतरावरच एक गोणी पडलेली असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. ती उघडली असता, त्यामध्ये ओमकार आढळून आला. नागरिकांनी तत्काळ त्याला रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.- शवविच्छेदनासाठी मृतदेह पालिका रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :MurderखूनNavi Mumbaiनवी मुंबई