शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे संतापली; पत्नीनं ५ मुलांना संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 12:21 IST

पतीचा राग मुलांवर काढला; पाच मुलांची निर्घृण हत्या

बर्लिन: जर्मनीत एका महिलेनं तिच्या ५ मुलांची हत्या केली आहे. पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्यानं महिला नाराज होती. मुलांना मारण्याआधी तिनं पतीला मेसेज केला. आता तू पुन्हा कधीच मुलांना पाहू शकणार नाहीस, असा मेसेज पतीला करून महिलेनं स्वत:च्या मुलांना संपवलं. या प्रकरणात महिलेला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

मिरर युकेनं दिलेल्या वृत्तानुसार, दुसऱ्या महिलेसोबत पतीचा फोटो पाहून २८ वर्षांची क्रिस्टिन संतापली. तिनं तिच्या ५ मुलांना गळा आवळून संपवलं. ३ सप्टेंबर २०२० रोजी ही घटना घडली. क्रिस्टिनच्या सर्व मुलांचं वय ११ वर्षांपेक्षा कमी होतं. क्रिस्टिननं आधी मुलांना विषारी पदार्थ खाऊ घातले. त्यानंतर गळा आवळून त्यांची हत्या केली. बाथटबमध्ये बुडवल्यानं आणि श्वास कोंडला गेल्यानं मुलांचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं.

क्रिस्टिनला एकूण सहा मुलं होती. त्यातील पाच जणांना तिनं रागाच्या भरात संपवलं. तिचा मोठा मुलगा त्यावेळी घराबाहेर होता. त्यामुळे तो वाचला. मुलांना संपवल्यानंतर क्रिस्टिन डसेलडोर्फ रेल्वे स्थानकात पोहोचली. तिथे तिनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा जीव वाचला. 

क्रिस्टिननं तिच्या पतीचा एका दुसऱ्या महिलेसोबतचा फोटो पाहिला. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय तिला आला. त्यातून तिनं पाच मुलांच्या हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी न्यायालयात ४० जणांनी साक्ष दिली. न्यायालयानं क्रिस्टिनला दोषी ठरवलं. तिच्या मोठ्या मुलाचा ताबा आजीला देण्यात आला आहे.