शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गणपती विसर्जनाच्या गर्दीचा फायदा चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 21:51 IST

गर्दीचा फायदा उचलून या चोरटयांनी अनेक भक्तांच्या सोनसाखळ्या आणि पाकिटे लांबवली

ठळक मुद्देभाविकांनी काळाचौकी पोलीस ठाण्यास संपर्क साधून सहकार्य करावे असे आवाहन परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी केले आहे.  गुन्हे शाखा कक्ष ६ च्या पथकाने केलेल्या चौकशीतही आरोपींची कबुली दिली.

मुंबईमुंबईत काल गणेश विसर्जनाची धूम सुरु असताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन गणेश भक्तांच्या सोनसाखळ्या आणि पाकिटे लांबविणाऱ्या परराज्यातील गुन्हेगारांच्या टोळीतील आठ जणांना गुन्हे शाखा कक्ष ६ च्या पोलीस पथकाने गुरुवारी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमालाही हस्तगत करण्यात आला आहे. या चोरट्यांनी मुंबईचा प्रसिद्ध आणि नवसाला पावणाऱ्या लालबागचा राजा या गणेशोत्सवाला अलोट गर्दी जमते याच  गर्दीचा फायदा उचलून या चोरटयांनी अनेक भक्तांच्या सोनसाखळ्या आणि पाकिटे लांबवली असल्याचे तपासात उघडकीस आले. तसेच लालबाग परिसरात गणपती विसर्जन मिरवणुकीत ज्या भाविकांचे मोबाईल फोन चोरीस गेले असतील अशा भाविकांनी काळाचौकी पोलीस ठाण्यास संपर्क साधून सहकार्य करावे असे आवाहन परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी केले आहे.  गुन्हे शाखेच्या कक्ष ६ च्या पथकाला खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या गर्दीत सोनसाखळी आणि पाकिटे चोरणारी परराज्यातील गुन्हेगारांची टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने ठिकठिकाणी गर्दीच्या ठिकाणी सापळे रचण्यास सुरुवात केली. असाच सापळा लोटस जंक्शन शिवाजीनगर या ठिकाणी सापळा रचला. दरम्यान, खबऱ्याने स्कार्पिओ गाडीची दिलेल्या माहितीच्याआधारे पोलिसांनी गाडी थांबविण्यासाठी इशारा केला. मात्र, स्कॉर्पिओ वेग वाढवून पळविण्यात आली. पोलीस पथकाने गाडीचा पाठलाग करून काही अंतरावर स्कॉर्पिओ गाडी थांबवली. पोलिसांनी वाहन आडवे घालून गाडीस घेराव घातला. गाडीतील ८ इसमांना काल ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी करून अंगझडतीत सोनसाखळ्या आणि रोख रक्कम उडविल्याची कबुली आरोपींनी  दिली.चोरट्यांनी दिली कबुली मुंबईचा प्रसिद्ध आणि नवसाला पावणाऱ्या लालबागचा राजा या गणेशोत्सवाला अलोट गर्दी जमते याच  गर्दीचा फायदा उचलून या चोरटयांनी अनेक भक्तांच्या सोनसाखळ्या आणि पाकिटे लांबविली. त्या भाविकांनी या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे नोंदविले. गुन्हे शाखा कक्ष ६ च्या पथकाने केलेल्या चौकशीतही आरोपींची कबुली दिली. गुन्हे शाखेने काळाचौकी पोलीस ठाण्याच्या ताब्यात या आरोपीना दिले. पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. 

टॅग्स :ArrestअटकRobberyचोरीGanesh Visarjanगणेश विसर्जनMumbaiमुंबईLalbaugcha Rajaलालबागचा राजा