शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाद्वारे बँकांना गंडा घालणारी पाच जणांची टोळी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 07:05 IST

रोमी कपूर हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून बॅँकेत एंजट म्हणून काम करणारा तिवारी त्याला माहिती पुरवत होता, या टोळीकडून फसवणुकीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

मुंबई : बनावट कागदपत्रे, दस्तऐवज बँकेत सादर करून कर्ज घेत, त्यांची परतफेड न करता बँकेला गंडा घालणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा शनिवारी पोलिसांनी पर्दाफाश केला. रोमी कपूर उर्फ कौशिककुमार कौस्तुभ नाथ (४१), साकेत दीक्षित (३४), विशाल तिवारी (४१), जिग्नेश रजनी (३१) आणि विकास डोंगरे (३४) अशी त्यांची नावे असून त्या सर्वांना ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

रोमी कपूर हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून बॅँकेत एंजट म्हणून काम करणारा तिवारी त्याला माहिती पुरवत होता, या टोळीकडून फसवणुकीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त अकबर पठाण यांनी व्यक्त केली. अटक केलेल्यांपैकी तिवारी हा बँकेचा दलाल आहे. तो कर्ज काढून देण्याचे काम करतो, तर उर्वरित तिघांनी बनावट कागदपत्रे नाथला देऊन बँकेकडून गृहकर्ज, वाहन कर्ज, खासगी कर्ज काढत पैसे उकळले.

मांडवी बँकेकडून वाहन कर्ज घेण्यासाठी रजनी आणि डोंगरे यांनी त्यांच्या बंद असलेल्या एस.एस. मोटर्स कंपनीची बनावट कागदपत्रे नाथ याला बनवून दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नाथने ठाण्यात गाळा घेतल्याचे दाखवत मांडवी बँकेतून ५९ लाख आणि बँक आॅफ इंडियामधून ७ लाख रुपयांचे खासगी कर्ज काढले. तर इंडियन बँकेतून तिवारी आणि दीक्षित यांनी अनुक्रमे २९ आणि २१ लाखांचे वाहनकर्ज काढले. मात्र त्या कर्जाची परतफेडच केली नाही.गेल्या सप्टेंबर महिन्यापासून हे पाच जण बँकांना चुना लावत होते. ही माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष-११चे प्रभारी चिमाजी आढाव यांना मिळाली. या प्रकाराची दखल घेत रोमी कपूर हे बनावट नाव धारण केलेल्या नाथला आढाव यांच्या पथकाने सर्वात आधी ताब्यात घेतले. नाथच्या झडतीत पोलिसांना प्रत्येकी दोन पॅनकार्ड, आधारकार्ड, वाहनचालक परवाना आणि अन्य कागदपत्रे सापडली. या सर्वांवर एकाच व्यक्तीचा फोटो लावून राजन कपूर आणि कौशिक नाथ या दोन नावांनी ती तयार करण्यात आली होती. यासाठी त्याने बँक दलाल तिवारी याची मदत घेतल्याचे उघड झाले. ओशिवरा पोलीस ठाण्यात या फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास चिमाजी आढाव यांचे पथक करत होते. तिवारी आणि नाथकडून मिळालेल्या माहितीवरून अन्य तीन साथीदारांचा गाशादेखील त्यांनी गुंडाळला. या टोळीने जे कर्ज विविध बँकेतून काढले ते आपापसात वाटून घेतल्याची कबुली पोलिसांना दिली.नाथवर कोलकातामध्येही गुन्हा!नाथ हा उच्चशिक्षित असून त्याच्यावर कोलकातामध्ये देखील अशाचप्रकारे कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. तिवारी वगळता सर्व पदवीधर असून त्यांची पार्श्वभूमी पोलीस तपासत आहेत. झटपट पैसा कमवून उच्चभ्रू आयुष्य जगण्याच्या लालसेपोटी त्यांनी हा गुन्हा केल्याचे उघड झाले. त्यांनी अशा प्रकारे अजून काही बँकांची फसवणूक केली असल्याचा संशय पोलिसांना असून बँकांनी पुढाकार घेत तक्रार करावी, असे आवाहन उपायुक्त पठाण यांनी केले आहे.

टॅग्स :ArrestअटकbankबँकMumbaiमुंबई