शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरणारी मालेगावची ११ जणांची टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 22:48 IST

विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरण्यासाठी मालेगावहून दोन गाड्या करुन आलेल्या टोळीतील ११ जणांना गुन्हे शाखेच्या युनिट २ ने अटक केली असून त्यांच्याकडून ७६ मोबाईलसह दोन गाड्या असा १६ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. 

पुणे : विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरण्यासाठी मालेगावहून दोन गाड्या करुन आलेल्या टोळीतील ११ जणांना गुन्हे शाखेच्या युनिट २ ने अटक केली असून त्यांच्याकडून ७६ मोबाईलसह दोन गाड्या असा १६ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्यांना २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उबेदुर रहिमन महंमद दिलदार (वय १९), मुस्ताक अहमद महंमद इब्राहिम (वय ३५), फिरोज इक्बाल शाह (वय ४०) आणि जाकिर हुसेन महंमद एहसान (वय ४०, सर्वजण, रा. मालेगाव जि. नाशिक),  अकबरखान हबीब खान (वय ३०), अफसरखान हबीब खान (वय २६), महंमद शहजाद महम्मंद सुलेमान (वय १९) आणि मोहम्मद शाबान मुर्तजा (वय ४०, रा. मालेगाव, जि. नाशिक) अशी अटक केलेल्या आठ जणांची नावे आहेत. विसर्जन मिरवणुकीत रविवारी रात्री युनिट २ चे पथक गस्त घालत असताना कुंभारवाडा चौकात दोन संशयित थांबल्याचे या पथकाच्या लक्षात आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांच्याकडे ५ मोबाईल सापडले़ त्यांनी गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरल्याची कबुली दिली़ अधिक चौकशीत आणखी ८ ते १० जण आपल्याबरोबर आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन मालधक्का येथून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४ मोबाईल जप्त करण्यात आले़ विसर्जन मार्गावर गस्त घालून आणखी ६ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १५ मोबाईल जप्त केले गेले़ मालधक्का आणि शिवाजी चौकात असलेल्या दोन्ही गाड्या ताब्यात घेण्यात आल्या़ शिवाजी चौकातून दोघांकडून गाडीसह ४ मोबाईल ताब्यात घेतले. त्यांचे दोन साथीदार मालेगावला गेल्याचे समजल्यावर एक पथक तातडीने मालेगावला रवाना झाले व त्यातून दोघांना ताब्यात घेण्यात आले़.या कारवाईत आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून  ७६ मोबाईल व २ मोटारी असा १६ लाख ३५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे़ त्यांच्याविरुद्ध फरासखान्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट २चे पोलीस निरीक्षक गजानन पवार, सहायक निरीक्षक जयवंत जाधव, सहायक फौजदार शेखर कोळी, हवालदार दिनेश गडांकुश, अस्लम पठाण, राजू केदारी, किरण पवार, अजय खराडे, पोलीस नाईक किशोर वग्गू, अतुल गायकवाड, विशाल भिलारे, प्रसाद जंगीलवाड, अजित फरांदे, चंद्रकांत महाजन, गणेश नरुटे यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी