शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत ऑनलाईन क्रिकेट सट्ट्याचा पर्दाफाश; १० जणांना अटक, राज्यस्तरीय रॅकेटची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 20:48 IST

जिल्ह्यातील आष्टी परिसरात मोबाईलच्या माध्यमातून क्रिकेट, फुटबॉलचा ऑनलाईन सट्टा चालविणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला.

गडचिरोली/आष्टी : जिल्ह्यातील आष्टी परिसरात मोबाईलच्या माध्यमातून क्रिकेट, फुटबॉलचा ऑनलाईन सट्टा चालविणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. यात चंद्रपूर जिल्ह्यातील ३ बुकींसह एकूण १० जणांना अटक करण्यात आली. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन जुगाराच्या माध्यमातून क्रिकेटवर सट्टा चालविणारे रॅकेट गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात दि.३० ला अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर व त्यांच्या चमूने आष्टी परिसरातील छगन मठले, राजू धर्माडी, मनोज अडेटवार, द्राव्यराव चांदेकर, सुमित नगराळे आणि अहेरी-आलापल्ली परिसरातील सुरेंद्र शेळके, संदीप गुदप्पवार यांना चौकशीसाठी बोलाविले. चौकशीत हे सर्वजण ‘बेटएक्स १ डॉट को’ आणि ‘नाईस डॉट ७७७ डॉट नेट’ या बेकायदेशीर ऑनलाईन जुगार प्लॅटफाॅर्मच्या माध्यमातून क्रिकेट, फुटबॉल आणि बाबींसाठी बुकी म्हणून काम करत असल्याचे दिसून आले.या सर्व आरोपींविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ सहकलम जुगार अधिनियम तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना चार दिवसांचा पीसीआर मिळाला आहे.

२१ लाखांची रक्कम जप्तया आरोपींकडून २१ लाख ३३ हजार रुपयांची रोख रक्कम, तसेच सट्ट्यासाठी वापरले जाणारे मोबाईल हस्तगत करण्यात आले. या प्रकरणात मोठे राज्यस्तरीय ऑनलाईन जुगाराचे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

चंद्रपुरातील तिघे मुख्य वितरकगडचिरोली जिल्ह्यातील बुकींकडून मिळालेल्या माहितीच्याआधारे पोलिसांना चंद्रपुरातील बुकींची माहिती मिळाली. त्यात राकेश कोंडवार, रजिक अब्लुल खान आणि महेश अल्लेवार हे चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यातही बेकायदेशीरपणे ऑनलाईन सट्टा प्लॅटफाॅर्मचे मुख्य वितरक म्हणून काम करत असून, युजर आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून एजंट, ग्राहक तयार करतात, अशी माहिती समोर आली.