शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Param Bir Singh: परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ; यूएलसी घोटाळ्याच्या तपासात आर्थिक झोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 05:48 IST

ठाणे पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई :  परमबीर सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना त्यांनी २०१७ मध्ये झालेल्या यूएलसी घोटाळ्यातील आरोपी बिल्डरांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याच्या आरोपप्रकरणी सखोल तपास करण्याचे आदेश राज्य सरकारने ठाणे पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

यूएलसी घोटाळ्याची चौकशी करताना माझ्या आदेशाशिवाय कोणाचीही चौकशी अथवा गुन्हे दाखल करू नका, असे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ठाणे पोलिसांना स्पष्टपणे बजावले होते. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराचा सखोल तपास करण्यासाठी गृह विभागाने ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक नेमले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. यासंदर्भात २०१७ मध्येच एफआयआर दाखल झाला असून त्यानुसार ठाणे पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे गृह विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

यूएलसी घोटाळ्याच्या तपासात परमबीर सिंग यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप मीरा-भाईंदर येथील बिल्डर राजू शहा यांनी केला आहे. याबाबत त्यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यानुसार ठाणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून यूएलसी घोटाळ्याच्या तपासाशी संबंधित विविध अधिकाऱ्यांचे जबाबही नोंदविले आहेत. परमबीर सिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची ही पाचवी तक्रार आहे. निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणात परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद वाटल्याने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी केली होती. आता यूएलसी घोटाळ्याच्या चौकशीत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी तपास सुरू झाल्याने परमबीर सिंग यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.

सिंग यांच्याविरुद्धचा तपास सीआयडीकडे हस्तांतरितअकोला येथील पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी केलेल्या तक्रारीवरून परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास गृह विभागाने सीआयडीकडे हस्तांतरित केला आहे. सीआयडीने याप्रकरणी बुधवारी क्रिकेट बुकी सोनू जालान, भीमराव घाडगे आणि जालानचा मित्र मुनीर अहमद पठाण यांचा जबाब नोंदवून घेतला.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंग