शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणे मित्रांनी सरप्राईझ दिले!, तलवारीने २१ केक कपणारा सापडला

By गौरी टेंबकर | Updated: September 19, 2022 16:44 IST

अल्पवयीन असल्याने अटक नाही

मुंबई: वाढदिवस साजरा करण्यासाठी तलवारीने २१ केक कापणाऱ्या १७ वर्षीय तरुणाला एम एच बी कॉलनी पोलिसांनी शोधून काढले आहे. अल्पवयीन असल्याने त्याला अटक करण्यात आली नसून आपल्याला मित्रांनी सरप्राइज दिले असे उत्तर त्याने तपास अधिकाऱ्याना चौकशी दरम्यान दिल्याचे वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

बोरिवली पश्चीमच्या सलमान हॉटेल गल्ली क्रमांक १४ याठिकाणी त्याने उघडपणे तलवारीने केक कापला होता. हा प्रकार १६ सप्टेंबर रोजी घडल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा तरुण सध्या अकरावीच्या वर्गात शिकत आहे. त्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये तो ज्या तलवारीने केक कापत आहे ती तलवार देखील पोलिसांनी हस्तगत केली आहे. जी त्याने त्याच्या पलंगाच्या खाली दडवून ठेवली होती असे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

तसेच वाढदिवसाच्या रात्री कोणीतरी माझ्या हातात ती अचानक दिली असेही उत्तर त्याने पोलिसाना दिले आहे. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तो अल्पवयीन असल्याने त्याला अटक करण्यात आली नाही. त्याच्या पालकांना बोलावून याबाबत नोटीस देत त्याला जुवेनाईल कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आले असल्याचे अधिकाऱ्याने नमूद केले. मित्रांनी सरप्राइज दिले असल्याचेही त्याचे म्हणणे असून विद्यार्थ्याकडे तलवार आली कुठून याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. 

व्हिडीओ झाला व्हायरलसदर घटनेचे शूटिंग करून तो व्हिडियो त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यानंतर तो सर्वत्र व्हायरल झाल्यावर एमएच बी कॉलनी पोलीस ठाण्याने त्याची दखल घेत तरुणावर संबंधित कलामांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई