शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत दोन भावांची वेठबिगारीतून केली मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 00:24 IST

मालकावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा : श्रमजीवी संघटनेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : तालुक्यातील पाये, नाईकपाडा येथे राहणाऱ्या राजेश भोईर (२४) व भीमा भोईर (२२) या दोन भावांची श्रमजीवी संघटनेने वेठबिगारीतून मुक्तता केली आहे. खार्डी गावातील निलेश तांगडी याने सर्व्हिस सेंटर व शेतीच्या कामावर दोन वर्षांपासून अहोरात्र राबवून त्यांची शारीरिक व आर्थिक पिळवणूक केली. या अन्यायाविरोधात पीडित तरुणांनी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून तालुका पोलीस ठाण्यात निलेशविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.निलेश याने पीडित तरुणांच्या लग्नासासठी एक लाख १९ हजार ६९० रुपये खर्च केला होता. त्याबाबत त्याने लिहून दिले होते. लग्नानंतर काही दिवसांनी दोघांनीही निलेशच्या कैलास सर्व्हिस सेंटर येथे कामावर जाण्यास सुरुवात केली. प्रत्येकी तीन हजार ५०० रुपये महिना वेतन निश्चित केले. दोघांना दुचाकी गाडी घेऊन दिली होती. त्याचे हप्ते पगारातून कापले जायचे. सर्व्हिस सेंटरवर काम नसले की, निलेश त्यांच्याकडून शेती किंवा अन्य कामे करून घ्यायचा. कोरोनामुळे काम बंद असल्याने दोघे भाऊ हे घरातील आवणीचे काम करत होते. त्याने दोघा भावांना फोनवरून आवणीच्या कामाला चला, असा तगादा लावला. घरच्या शेतीचे काम आटोपून कामावर येतो, असे सांगितले. मात्र, निलेश ऐकत नव्हता. त्यामुळे या दोघांनी हिशेब करण्यास सांगितले. याचा राग मनात ठेवून निलेश याने दोघांना मारण्याची धमकी दिली. व्याजासह तीन लाख रुपये एका महिन्यात परत द्या, असे धमकावले. या कुटुंबाने श्रमजीवी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस बाळाराम भोईर यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांची मदत घेऊन सोमवारी रात्री उशिरा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला.तहसीलदार शशिकांत गायकवाड यांना हा प्रकार समजल्यावर यांनी श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांसह पीडित राजेश व भीमा या दोघांना कार्यालयात बोलावून त्यांना वेठबिगारमुक्तीचे दाखले देऊन मुक्त केले.भिवंडी शहराध्यक्ष सागर देसक, सचिव मोतीराम नामकुडा, भोईर, ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, ठाणे जिल्हा शेतकरी घटकप्रमुख संगीता भोमटे, ठाणे जिल्हा महिला घटकप्रमुख जया पारधी यावेळी उपस्थित होते.\सुनील लोणे, केशव पारधी, गुरुनाथ वाघे, महेंद्र निरगुडा, किशोर हुमणे यांनीही पीडितांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले. याप्रकरणी अधिक तपास गणेशपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गोडबोले करीत आहेत.