शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

कोरोनाला घाबरून घोटाळेबाज भारतात आला, पोलिसांच्या जाळ्यात सापडला!

By पूनम अपराज | Updated: March 23, 2020 21:27 IST

महत्वाचे म्हणजे होम क्वारंटाइन असलेला हा आरोपी दुबईहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला आणि त्याला तिथे ताब्यात घेण्यात आले.

ठळक मुद्देन्यायालयाने या आरोपीला २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलिसांनी या प्रकरणी सीआरपीसी कलम २९९ नुसार आरोपपत्र दाखल केले होते. 

पूनम अपराज

मुंबई - ९०० कोटींच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात २०१७ पासून फरार असलेला पाहिजे आरोपी दुबईहून मुंबईत आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. महत्वाचे म्हणजे होम क्वारंटाइन असलेला हा आरोपी दुबईहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला आणि त्याला तिथे ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्या आरोपीला एल. टी. मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत असून दुसरीकडे पोलीस रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यातच तुरुंगातील कैदयांची गर्दी पाहता सर्वोच्च न्यायालयाने कच्च्या कैद्यांना सोडण्याचे आदेश पारित केले आहेत. तर, २०१७ पासून देश सोडून पळालेल्या एका आरोपीच्या मुसक्या एल. टी. मार्ग पोलिसांनी आवळल्या आहे. २०१७ साली ९०० कोटींचा चुना लावल्याप्रकरणी बाप आणि लेकाविरोधात भा. दं. वि. कलम ४०६, ४२० आणि १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, दोघेही परदेशात जाऊन लपले होते. त्यानंतर वडिलांचा मृत्यू झाला तर मुलगा दुबईत लपून बसला होता. मात्र, दुबईत कोरोनाचा कहर पाहता आरोपी मुलाने पळ काढला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला. मात्र, दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी सीआरपीसी कलम २९९ नुसार आरोपपत्र दाखल केले होते. 

अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे होम क्वारंटाइन असलेला हा आरोपी असल्याने त्याचे नाव उघड करू शकत नाही. मात्र, पोलिसांनी त्याला क्वारंटाइन असल्याने एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यातील कोठडीत एका खोलीत बंदिस्त करून ठेवले आहे. न्यायालयाने या आरोपीला २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, कोरोनाची वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या आरोपीची चौकशी स्वतःची काळजी घेऊन करणं तितकंच महत्वाचं आहे. 

टॅग्स :Arrestअटकcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसfraudधोकेबाजी