शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक, नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 00:20 IST

crime news : दादा पाटीलवाडी येथील किरण सोसायटी येथे एक खोली भाड्याने घेऊन या न्यू वर्क रिक्रूटमेंट या नावाने प्लेसमेंटची कंपनी सुरू झाली होती.

ठाणे : बँकेत तसेच मोठ्या कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुण-तरुणींकडून पैसे उकळणाऱ्या ठाण्यातील एका प्लेसमेंट कंपनीचे पितळ उघडे पडले आहे, या कंपनीने शेकडो बेरोजारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकलल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनीच्या मालकांनी पळ काढल्याची माहिती सूत्रांनी दिली.दादा पाटीलवाडी येथील किरण सोसायटी येथे एक खोली भाड्याने घेऊन या न्यू वर्क रिक्रूटमेंट या नावाने प्लेसमेंटची कंपनी सुरू झाली होती. सहा महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या या कंपनीने विविध वेबसाइटवर माहिती देऊन नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगारांना आपल्या जाळ्यात ओढायला सुरुवात केली होती. १९ वर्षीय तरुणीने एका जॉब साइटवर स्वत:ची माहिती आणि मोबाइल क्रमांक नोंदविला होता.२५ मार्च २०२१ रोजी निशा जाधव यांना एका महिलेने फोन करून न्यू वर्क रिक्रूटमेंट या प्लेसमेंट येथून बोलत असल्याचे सांगून निशा यांना बायोडाटा घेऊन कार्यालयात बोलविले. बँकेत चार जागा भरायच्या असल्याचे सांगून तिथे पाठविण्यासाठी त्यांच्याकडून तीन हजार घेतले. त्यानंतर बँकेचा पत्ता फोनद्वारे देण्यात येईल, असे सांगितले. काही दिवस उलटूनही या रिक्रूटमेंटकडून काहीच फोन न आल्यामुळे निशा यांनी ठाण्याचे ते कार्यालय गाठले. तिथे अशा प्रकारे अनेकांची फसवणूक झाल्याचे त्यांना आढळले. त्यांच्याकडूनही त्यांनी पैसे उकळून अशीच बतावणी केली. ही कंपनी फसवी असल्याचे समजताच काही तरुणांनी स्थानिक समाजसेवक तुषार रसाळ यांच्या मदतीने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

२५ ते ३१ मार्चदरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला असून अशा अनेकांची यामध्ये १९ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर या कंपनीच्या संचालकाने पोबारा केला आहे. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी