शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

प्रॉपर्टी गुंतवणुकीच्या नावावर साडे पाच कोटीची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 23:41 IST

संपत्तीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून एका खासगी कंपनीच्या संचालकाची ५ कोटी ५५ लाखाने फसवणूक करण्यात आली. सीताबर्डी पोलिसांनी प्रॉपर्टी डीलरसह आठ लोकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देपीडिताने तणावात घेतल्या गोळ्या : सीताबर्डीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपत्तीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून एका खासगी कंपनीच्या संचालकाची ५ कोटी ५५ लाखाने फसवणूक करण्यात आली. सीताबर्डी पोलिसांनी प्रॉपर्टी डीलरसह आठ लोकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जाहिद मिर्झा बेग राय न्यू कॉलनी, गौतम सिंह रा. जाफरनगर, बंटी शेलेंद्र शॉ, प्रशांत सतराळकर, रा. व्हीसीए स्टेडियमजवळ सदर, आशिष जैन, सुजित कुमार, नईम खान आणि वाकेकर परिवार अशी आरोपीची नावे आहे तर सुशील कोल्हे (२९) रा. वांजरा असे तक्रारकर्त्याचे नाव आहे.कोल्हे यांची सिव्हील लाईन्स येथे एजीएम कॉर्पोरेशन नावाची डिजिटल अ‍ॅडव्हर्टायजिंग कंपनी आहे. बेग आणि सिंह प्रॉपर्टी डीलर आहेत. आरोपींनी व्हीसीए स्टेडियम समोरील चर्चची, जरीपटका स्मशानभूमीच्या जवळची आणि वाकेकर परिवाराच्या शताब्दीनगर चौकातील जमीन दाखवली. कोल्हे यांना कमी किमतीत ही जमीन विकायची असल्याचे सांगितले. भविष्यात या जमिनीची किमत कितीतरी अधिक असल्याचे आमिष दाखविले. बोगस दस्तावेज दाखवून तिन्ही जमिनीत गुंतवणूक करण्यास सांगितले. आरोपींच्या आमिषाला बळी बडून कोल्हे यांनी २०१८ मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्याने दोन वर्षात ५ कोटी ५५ लाख रुपये आरोपींना दिले. यानंतर कोल्हे ती जमीन आपल्या नावावर करण्याची मागणी केली. परंतु आरोपी टाळाटाळ करू लागले. गेल्या सहा महिन्यापासून कोल्हे आपले पैसे परत मागण्यासाठी तगादा लावत होते. परंतु आरोपी पैसे देण्यास सातत्याने टाळाटाळ करीत असल्याने कोल्हे प्रचंड तणावात आले. त्यांच्यावर मोठे कर्ज झाले. त्यात त्यांनी मोठ्या प्रमाणावर गोळ्यांचे सेवन केले. यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. या आधारावर सीताबर्डी पोलिसांनी तपास सुरु केला. कोल्हे यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याची माहिती होताच आरोपी भूमिगत झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. फसवणुकीची रक्कम अधिक असल्याने या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवण्यात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीInvestmentगुंतवणूक