शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जादा परतावा देण्याच्या अमिषाने दोन कोटी ९२ लाखांची फसवणूक; संचालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2022 20:09 IST

ठाणे आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई: पत्नी पाठोपाठ पतीचीही कोठडीत रवानगी

ठाणे: जादा परतावा देण्याच्या अमिषाने तब्बल ३७ गुंतवणूकदारांची दोन कोटी ९२ लाखांची फसवणूक करणाºया बंटी बबली पैकी श्रीकांत पालांडे यालाही ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली आहे. त्याला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यातील आरोपी श्रद्धा आणि तिचे पती श्रीकांत यांनी त्यांच्या अनुजा कन्सल्टन्सीतर्फे फॉरेक्स  ट्रेडिंगमध्ये एक लाखांची गुंतवणूकीवर महिना पाच टक्के परतावा मिळेल, अशा आकर्षक तसेच अशक्यप्राय योजनांचे अमिष गुंतवणूकदारांना दाखविले. याच अमिषाला बळी पडून ठाणे, मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि बैगलोर येथील अनेक गुंतवणूकदारांनी अनुजा कन्सल्टन्सी या कंपनीच्या नावाने असलेल्या बँक खात्यात तसेच त्यांच्या वैयक्तिक खात्यावर पैसे जमा केले.  या दाम्पत्याने गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक रक्कम स्वीकारुन मुदतीनंतर मात्र त्यांना कोणताही परतावा अथवा मुळ मुद्दल रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. याबाबत कासारवडवली पोलीस ठाण्यात ऑगस्ट २०२१ मध्ये फसवणूकीसह महाराष्टÑ ठेवीदारांचे हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ नुसार गुन्हा दाखल झाला होता. तपासामध्ये अशा ३७ गुंतवणूकदारांकडून दोन कोटी ९२ लाखांची रक्कम या दाम्पत्याने उकळल्याचे समोर आले. श्रद्धा पालांडे हिला ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश पन्हाळे यांच्या पथकाने यापूर्वीच २४ मे २०२२ रोजी अटक केली आहे.     सुरुवातीला याप्रकरणी चार जणांची ६९ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले होते. ही व्याप्ती मोठी असल्याचे उघड झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास ठाणे आर्थिक  गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. श्रीकांत पालांडे फरार झाला होता. अखेर त्याचाही  शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. त्याला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये आणखीही गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.