शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने ११ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 11:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : खासगी वित्तसंस्थेत कार्यरत असलेल्या सीमा होवाळ (४९) यांची कर्ज मंजुरीच्या नावाखाली तब्बल ११ लाख ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खासगी वित्तसंस्थेत कार्यरत असलेल्या सीमा होवाळ (४९) यांची कर्ज मंजुरीच्या नावाखाली तब्बल ११ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. तोतया बँक व्यवस्थापक व एजंटने संगनमताने ही फसवणूक केली असून, बीकेसी पोलिसांनी १९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.

होवाळ या अंधेरीच्या अर्बन फायनान्स प्रा. लि.मध्ये कार्यरत असून, शासकीय व खासगी बँकांमधून कर्ज मंजुरीसाठी फाईल तयार करण्याचे काम करतात. कामाच्या अनुषंगाने त्यांची ओळख हिमांशू सावला व अभिजित या एजंटांमार्फत संजय पांडेशी झाली. पांडेने कॅनरा बँक (बीकेसी) व आयसीआयसीआय बँकेतील अधिकाऱ्यांशी जवळीक असल्याचा दावा करत मोठ्या रकमेची कर्जे मंजूर करून देतो, असे सांगितले. सप्टेंबर २०२५ मध्ये प्रभाकर मिश्रा या एजंटने त्यांचा मालक असलेले बांधकाम व्यावसायिक संजय मिश्रा यांना सुमारे १०० कोटी रुपयांच्या कर्जाची आवश्यकता असल्याचे होवाळ यांना सांगितले.

पांडेने कॅनरा बँकेकडून १०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे बनावट पत्र व्हॉट्सॲपवर पाठवून कर्जासाठी १० टक्के रक्कम भरण्याची अट घातली. मात्र, एवढी मोठी रक्कम भरणे शक्य नसल्याचे संजय मिश्रा यांनी सांगितल्यानंतर पर्याय शोधण्याचे आश्वासन दिले. मुंबईत येण्यासाठी पांडेने विमान तिकीट मागितले. त्यानुसार २ डिसेंबर रोजीचे लखनौ-मुंबई तिकीट बुक केले.  मुंबईत आल्यानंतर त्याने कायदेशीर खर्चासाठी ६० हजार रुपयांची मागणी केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Loan approval scam: Woman defrauded of ₹11 lakhs in Mumbai.

Web Summary : A finance professional was defrauded of ₹11 lakhs under the guise of loan approval. Imposters posing as bank officials and agents conspired in the scam. BKC police have registered a case.
टॅग्स :fraudधोकेबाजी