शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या सहायक व्यवस्थापकाकडून गंडा; व्यावसायिक टार्गेटवर, चार कोटींचा चुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 05:22 IST

बनावट स्वाक्षऱ्या आणि शिक्केही बनवून व्यावसायिकासोबत करार केला. तो दुबईहून परतल्यावर चेन्नई पोलिसांनी त्याला अटक केली.  

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या माजी ३२ वर्षीय सहाय्यक व्यवस्थापकाने शहरातील दोन व्यवसायांची ४.१७ कोटींची फसवणूक केली. याप्रकरणी एलटी मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. त्याने, तो दुबईस्थित एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो. त्याच्या कंपनीत टक्केवारीचा हिस्सा मिळवण्यासाठी त्याने त्यांना पैसे देण्याचे आमिष दाखवून गंडविले.

प्रतीक राधाकृष्णन  एका बँकेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करत होता, तेथून त्याला बडतर्फ करण्यात आले आहे. त्याने  मुंबई आणि चेन्नईमध्ये अनेक लोकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. झवेरी बाजारातील कृष्णा देवासी आणि त्यांचे नातेवाईकासोबत राधाकृष्णनने मैत्री केली. सुरुवातीला त्याचे वाहन भाड्याने देत विश्वास संपादन केला. त्यानंतर दुबईत काम करत असलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीत त्यांना वाटा देण्याचे आश्वासन देऊन विविध बहाण्याने त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. 

आरोपींनी अशाच प्रकारे चेन्नई येथील एका व्यावसायिकाला कपड्याच्या ब्रँडची फ्रेंचायझी देण्याचे आश्वासन देऊन २ कोटी ८२ लाखांना गंडविले. त्याने बनावट स्वाक्षऱ्या आणि शिक्केही बनवून व्यावसायिकासोबत करार केला. तो दुबईहून परतल्यावर चेन्नई पोलिसांनी त्याला अटक केली.  

दुबईच्या बँक खात्यात ५ हजार कोटीआरोपी एका राष्ट्रीयीकृत बँकेत काम करायचा. मात्र, बँकेने त्याला काढून टाकले. “त्याने तक्रारदाराला चेन्नई पोलिसांनी अटक केल्यावर वकिलांची फी देण्यासही भाग पाडले. दुबईतील विविध बँक खात्यांमध्ये ५ हजार कोटींहून अधिक रक्कम असल्याचे सांगून, तक्रारदाराला व्याजासहित सर्व पैसे देणार असल्याचे सांगितल्यामुळे तक्रारदाराने ते पैसेही दिल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी