शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

तीन मोटारसायकलींसह चार चोरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 04:29 IST

दुचाकी आणि मोबाइल चोरी करत उपनगरात धुमाकूळ घालणाऱ्या चार सराईत चोरांना बांगुरनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

मुंबई : दुचाकी आणि मोबाइल चोरी करत उपनगरात धुमाकूळ घालणाऱ्या चार सराईत चोरांना बांगुरनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या तीन दुचाकी देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.सिद्धार्थ पांडे (१९), शोएब खान उर्फ अब्बू (१९), शुभम अन्सारी (२३) आणि त्यांच्या सतरा वर्षीय साथीदाराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. हे चौघे गोरेगाव आणि जोगेश्वरी परिसरात राहणारे आहेत. रिक्षातून प्रवास करणाºया महिला प्रवाशांचा स्कुटीवरून पाठलाग करायचा आणि संधी साधत त्यांच्याकडे असलेला मोबाइल ते हिसकावून पसार व्हायचे. या तक्रारी वाढीस लागल्याने परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त मोहन दहिकर आणि बांगुरनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शोभा पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक कदम आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. यात स्थानिक खबऱ्यांचीही मदत घेण्यात आली.तपासाअंती चौघांना अटक करण्यात बांगुरनगर पोलिसांना यश आले. त्यांच्यावर मोबाइल चोरीचे १५ तर दुचाकी चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत तीन स्कुटी पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केल्या आहेत. या चौघांवर बांगुरनगरसह गोरेगाव, ओशिवरा, अंबोली, जोगेश्वरी आणि अंधेरी पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. यातील तिघांना न्यायालयाने १६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून चौथ्या अल्पवयीन आरोपीला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी