शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

विमानतळावर ‘कस्टम’चा लाचखोरीचा धडाका सुरूच; ४ जणांना CBI कडून अटक 

By मनोज गडनीस | Updated: February 21, 2023 05:42 IST

१० दिवसांत चार अधिकारी सीबीआयकडून जेरबंद; जी-पेवर स्वीकारली लाच

मुंबई : परदेशातून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होणाऱ्या प्रवाशांकडून कस्टम अधिकाऱ्यांनी पैसे उकळण्याच्या घटना वाढीस लागल्या असून १० आणि ११ फेब्रवारीला आणखी दोन प्रवाशांकडून अनुक्रमे ७ हजार व ५ हजार रुपयांची लाच जी-पेवरून स्वीकारल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. गेल्या दहा दिवसांत मुंबई विमानतळावर जी-पेच्या माध्यमातून लाचखोरी झालेली ही चौथी घटना आहे.

विशेष म्हणजे, त्यातील तीनही प्रकरणांतील पैसे हे एका संजय जोशी नावाच्या इसमाच्या मोबाईल नंबरवर ट्रान्सफर झाले आहेत. लाचखोरी केलेल्या या सर्व कस्टम अधिकाऱ्यांना सीबीआयने अटक केली आहे. आतापर्यंत या लाचखोरीच्या प्रकरणात कस्टम विभागाच्या दोन अधीक्षक दर्जाच्या, एक निरीक्षक आणि एक हवालदार यांना अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लाचखोरी प्रकरणातील ताजी कारवाई १० व ११ फेब्रुवारीला झाली. 

दोन्ही प्रकरणात हवालदाराचा सहभाग दोन्ही प्रकरणात हवालदार सचिन वाडकर सहभागी होता. त्याची माहिती मिळाल्यामुळे सीबीआयच्याच एका अधिकाऱ्याने या प्रवाशाला फोन करत तुम्ही विमानतळावरून कस्टम अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून काही रक्कम जी-पे केली आहे का, याची विचारणा केली. या प्रवाशाने होकार दिल्यानंतर ते पैसे कस्टम शुल्क नव्हते तर अधिकाऱ्यांनी ते उकळल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्याने त्यांना सांगितले. त्यानंतर आपली फसवूणक झाल्याचे या प्रवाशाच्या लक्षात आले. त्यानंतर या प्रवाशाने सीबीआयला दिलेल्या लेखी तक्रारीची पडताळणी करत सीबीआयने गुन्हा दाखल केला. या प्रकरणी रिंकू सांगा या कस्टमच्या निरीक्षकाला आणि संतोष वाडकर याला सीबीआयने अटक केली आहे.

२८ हजारांची ड्युटी भरा१० फेब्रुवारीला केरळचा रहिवासी असलेला एक प्रवासी मुंबईत पहाटे दाखल झाला. तो ग्रीन चॅनेलमधून बाहेर पडल्यावर काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेल्या एका कस्टम अधिकाऱ्याने त्याला थांबवत त्याच्याकडील आयफोनवर २८ हजार रुपयांची ड्युटी भरण्यास सांगितले. मात्र, हा आयफोन आठ महिन्यांपूर्वी खरेदी केल्याचे या प्रवाशाने या अधिकाऱ्याला सांगितले. मात्र, तो अधिकारी ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याने दुसऱ्या अधिकाऱ्याला बोलावले. या अधिकाऱ्याने या प्रवाशाकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली अन्यथा कारवाई करण्याची धमकी दिली. मात्र, आपल्याकडे पैसे नसल्याचे प्रवाशाने सांगितले तेव्हा एक नंबर देत त्यावर पैसे जी-पे करण्यास सांगितले. ७ हजार रुपये संजय जोशी नावाच्या व्यक्तीच्या नावे ट्रान्स्फर झाले. सीबीआयने अधीक्षक श्याम सुंदर गुप्ता आणि हवालदार संतोष वाडकर याला अटक केली आहे.

११ फेब्रुवारीला घडलेल्या दुसऱ्या घटनेत, पुण्याची रहिवासी असलेली एक महिला प्रवासी दुबईतून मुंबईत दाखल झाली. तिने परदेशात सामान खरेदी केले असल्यामुळे ती रेड चॅनलमधून बाहेर पडली. त्यावेळी कस्टम अधिकाऱ्यांनी तिला घेरले. तिच्याकडे ८ ग्रॅम वजनाचा एक आणि ६ ग्रॅम वजनाचा एक असे दोन दागिने होते तर एक आयफोन होता. तिला या अधिकाऱ्यांनी या सामानावर पाच हजार रुपयांचे शुल्क भरावे लागेल असे सांगत हे पैसे जी-पे द्वारे भरण्यास सांगितले. तिला कोणतीही कल्पना नसल्याने तिने ते पैसे जी-पे केले. हे पैसे देखील संजय जोशी याच्याच खात्यावर गेले. 

टॅग्स :Airportविमानतळ