शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमध्ये महिलेला लुटणारे चौघे अटकेत, अवघ्या तासाभरात पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 00:42 IST

अलिबाग : अलिबाग शहरातील सरकारी रुग्णालय ते एसटी स्टॅण्ड रस्त्याने चालत जात असताना चार चोरट्यांनी महिलेला अडवून आमिष दाखवून ...

अलिबाग : अलिबाग शहरातील सरकारी रुग्णालय ते एसटी स्टॅण्ड रस्त्याने चालत जात असताना चार चोरट्यांनी महिलेला अडवून आमिष दाखवून तिची फसवणूक केली होती. अलिबाग पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी एका तासातच आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर, चौघांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत २ जुलैला सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास अलका नरेश आमले (५३, रा.चोंढी ता.अलिबाग) या एसटी स्टॅण्ड ररत्यावरून चालत येत असताना, अलिबाग जुनी नगरपालिका नाका येथे येताच त्यांना दोघांनी अडवले. एका ब्रह्मणाला मुलगा झाला आहे. तो गरीब महिलांना साडी, चप्पल व पैशाचे वाटप करीत आहे. तुम्ही तुमचे अंगावरील सोन्याचे गंठण पर्समध्ये काढून ठेवा, तरच तुम्हाला साडी, चप्पल व पैसे भेटतील, अशी बतावणी केली. महिलेने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन गळ्यातील ८० हजार रुपयांचे दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र पर्समध्ये काढून ती पर्स पिशवीत ठेवली असता, चोरट्यांनी हातचालाखीने पर्स पळवली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच महिलेने अलिबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अलिबाग पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी के.डी. कोल्हे यांनी झालेला प्रकार वरिष्ठांना कळवून त्यांच्या परवानगीने अलिबाग पोलीस ठाणेचे तपास पथक तयार करून एका तासामध्ये संतोष गंगाराम चौरे (रा.कोपरखैरणे), गोविंद काशिराम काळे (रा.कुळगाव, डोंबिवली), बालाजी कैलास चव्हाण (रा.डोंबिवली), जयराम किसन पवार (रा. कल्याण) यांना तवेरा वाहनासह जेरबंद केले, तसेच आरोपींकडून महिलेच मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे. तपासादरम्यान आरोपींनी रायगड जिल्ह्यात कर्जत पोलीस ठाणे येथे २, पेण पोलीस ठाणे येथे ३ अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली.ही कारवाई पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनानुसार व अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी अलिबाग सोनाली कदम, पोलीस निरीक्षक के.डी. कोल्हे यांच्या तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, पोलीस हवालदार अमोल हंबीर, पालीस नाईक राजा पिंगळे, पोलीस शिपाई सुनील फड यांनी कारवाई के ली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीalibaugअलिबागRaigadरायगड