शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपारा दरोडाप्रकरणी चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 00:46 IST

आरोपींना पोलीस कोठडी : ४० लाखांचा ऐवज हस्तगत, गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग उघड

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : युनायटेड पेट्रो फायनान्स गोल्ड व्हॅल्युअर आयटीआय गोल्ड लोनच्या नालासोपारा शाखेवर पडलेल्या एक कोटी ७७ लाखांच्या सशस्त्र दरोडाप्रकरणी टोळीतील चार जणांना पालघर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३९ लाख ७१ हजार ६०० रुपयांचा ऐवज तसेच पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. वसईच्या प्रथम वर्ग न्यायालयात त्यांना हजर केले असता १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आल्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

वसई तालुक्यातील तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत नालासोपारा येथील युनायटेड गोल्ड लोनच्या शाखेमध्ये २० सप्टेंबर २०१९ रोजी सहा जणांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक यांनी दोन पथके तयार केली होते. या पथकांमधील सहायक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे व संतोष गुर्जर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मुंबईमधील मालाड, अंधेरी येथे राहणाऱ्या चार दरोडेखोरांना अटक केली. त्यांच्यावर गुजरातमधील वापी, कर्नाटकमध्ये खून, दरोडे, चोरी, वाहनचोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली. यातील काही आरोपींचा संबंध छोटा राजन टोळीशी असल्याबाबत विचारले असता तपास सुरू असल्याने बोलता येणार नाही, असे शिंदे म्हणाले. प्रकरणाचा यशस्वी तपास करणाऱ्यांना १५ हजार रोख आणि प्रशस्तीपत्रक देण्याची घोषणाही शिंदे यांनी केली.सात वर्षांपूर्वीच्या चोरीची कबुली : चार आरोपींनी चौकशीत २८ आॅगस्ट २०१३ रोजी नालासोपारा येथील अ‍ॅक्सिस बँकेत कॅश घेऊन जाणाºया व्हॅनमधील सहा कर्मचाºयांना मारहाण करून तीन कोटी ८७ लाख ५० हजारांची रोकड लुटल्याचीही या आरोपींनी कबुली दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.