शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जामीन मिळालेल्या चार आरोपींना दर शनिवारी एलसीबीत हजेरीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 22:23 IST

तपासात सहकार्य हवे : चार आरोपींची चार तास चौकशी, प्रकरण जिल्हा बँकेचे

अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने म्युच्युअल फंडात ७०० कोटींची गुंतवणूक केली. त्यातून कमीशन स्वरुपात ३ कोटी ३९ लाखांचे ब्रोकरला दलाली (कमीशन) गेले या प्रकरणातील ११ पैकी चार आरोपींना जामीन मिळाला आहे. न्यायालयाने जामीन देताना चारही आरोपींना दर शनिवारी दुपारी १२ ते ४ वाजताच्या दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेत हजर राहावे लागणार आहे. तसेच या तपासात पोलिसांना त्यांना सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

यातील जामीन मिळालेले आरोपी नीता राजेंद्र गांधी, पुरुषोत्तम रेड्डी, राजेंद्र मोतीलाल गांधी व शिवकुमार गोकुलदास गट्टाणी असे आरोपींची नावे असून त्यांनी शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी लावली. त्यांना पोलिसांना तपासाच्या दृष्टीकोणातून सहकार्य करावे लागणार आहे. चारही आरोपींचे पोलिसांनी बयाण नोंदविल्याची माहिती आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०१७ ते २०२० दरम्यान निप्पोन कंपनीच्या म्युच्युअल फंडामध्ये तब्बल ७०० कोटींची गुंतवणूक केली. त्यापोटी ३ कोटी ३९ लक्ष रुपयांची दलाली ब्रोकरला देण्यात आल्याचे प्रकरणी तत्कलीन सीईओ जयसिंग राठोड यांच्यासह ११ जणांवर सिटी कोतवाली ठाण्यात गुन्हा नोंदवून सदर तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने तीन जणांचा जामीन अर्ज फेटाळला होता हे विशेष!बॉक्स:

फॉरेन्सिक ऑडिटनंतर चित्र होणार स्पष्टया प्रकरणात फॉरेन्सिक ऑडिट होणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने डीडीआर हे संबंधित तज्ज्ञ सीएची नेमणूक करून त्यांच्याकडून फॉरेन्सिक ऑडिट तयार करून त्याचा अहवाल आर्थिक गुन्हे शाखेला सादर करणार असल्याचे माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतरच यात आणखीन किती कोटींची गुंतवणूक व दलाली दिल्याचे स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी