शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

१८ लाखांच्या लुटमारीचा छडा चार आरोपी गजाआड : पावणे सात लाखांची रोकडही जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 23:43 IST

सोमवारी दुपारी आमदार निवासजवळ घडलेल्या १८ लाखांच्या लुटमारीचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींपैकी चौघांच्या मुसक्या पोलिसांनी बांधल्या असून त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी सहा लाख ७६ हजार रुपयांची रोकड तसेच दोन दुचाक्या असा साडेआठ लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

ठळक मुद्दे गुन्हे शाखेची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी दुपारी आमदार निवासजवळ घडलेल्या १८ लाखांच्या लुटमारीचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींपैकी चौघांच्या मुसक्या पोलिसांनी बांधल्या असून त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी सहा लाख ७६ हजार रुपयांची रोकड तसेच दोन दुचाक्या असा साडेआठ लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. योगेश विनायक सत्रमवार, मंगेश वासुदेव पद्मगिरवार, आकाश मोरेश्वर धोटे आणि निकी उर्फ निखिल धनराज गोखले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे पाच ते सात साथीदार फरार आहेत.विविध शासकीय निमशासकीय संस्था आणि व्यापारी प्रतिष्ठानांकडून रक्कम संकलित करून ती त्यांच्या त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम करणारी ब्रिंकस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे कर्मचारी श्रीकांत नानाजी इंगळे आणि सतीश धांदे हे दोघे सोमवारी दुपारी दीड वाजता १८ लाख, ३१ हजारांची रोकड असलेली बॅग घेऊन सिव्हिल लाईन मधील ॲक्सिस बँकेकडे चालले होते.  दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांना लाथ मारून खाली पडले आणि नंतर चाकूचा धाक दाखवून रोकड असलेली ही बॅग हिसकावून पळून गेले. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ निर्माण झाली होती.सीताबर्डी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तर या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पथक करू लागले. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. निलेश भरणे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके वेगवेगळ्या भागात आरोपींचा शोध घेऊ लागली. दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मधून हाती लागलेले धागा पकडून पोलिसांनी गोपालकृष्ण नगर वाठोडा या भागात राहणाऱ्या योगेश सत्रमवार आणि मंगेश पद्मगिरवार या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आकाश धोटे आणि निकी गोखले यांनाही पकडले. या चौघांनी गुन्ह्याची कबुली देतानाच त्यांच्याकडे ठेवलेली सहा लाख,७६ हजारांची रोकड पोलिसांच्या हवाली केली. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाक्याही पोलिसांनी जप्त केल्या. अनेक दिवसांपासून होती योजना या गुन्ह्यात सहा आरोपी असल्याचे तक्रारकरते इंगळे आणि त्यांच्यासोबतचे धांदे यांनी पोलिसांना सांगितले होते. मात्र या गुन्ह्यात आठ ते दहा आरोपींचा समावेश असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. त्यानुसार अन्य फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांना आम्ही लवकरच अटक करू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर

गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १२ तासात आरोपींच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी बजावल्याबद्दल पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गुन्हे शाखेच्या तपास पथकाचे अभिनंदन केले. ही कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे, उपयुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहाय्यक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मयूर चौरसिया, राजकुमार त्रिपाठी, हवालदार रवींद्र मांडे, शंकर शुक्ला, नायक नरेंद्र ठाकूर, रवी अहिर,  प्रविन रोडे, कुणाल मसराम, सागर ठाकरे, प्रमोदसिंग ठाकूर, सुहास शिंगणे, घोंगडे, रोहित काळे, तसेच हवलदार देविदास दुबे यांचे डॉ. उपाध्या यांनी आज कौतुक केले. या पथकाला एक लाख रुपयांचे बक्षीसही त्यांनी जाहीर केले. 

टॅग्स :RobberyचोरीArrestअटक