शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानच्या माजी आमदाराला अटक; मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून केली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 13:16 IST

सुमारे ८  ते १0 कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने राजस्थानच्या  धौलपूरचा माजी आमदार बनवारीलाल कुशवाहला अटक केली.

ठळक मुद्देमोठ्या परताव्याचे आमिष दाखवून शहर व परिसरातील जवळपास २ ते ३ हजार नागरिकांची फसवणूक गरिमा रिअल इस्टेट अँड अलाईड लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक करायला लावली

औरंगाबाद : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून शहर व परिसरातील जवळपास २ ते ३ हजार नागरिकांना गरिमा रिअल इस्टेट अँड अलाईड लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक करायला लावून सुमारे ८  ते १0 कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने राजस्थानच्या  धौलपूरचा माजी आमदार बनवारीलाल कुशवाहला आज बुधवारी अटक केली. दरम्यान, न्यायालयाने त्याला ७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.  

कुशवाहने गरिमा या चिटफंड कंपनीच्या माध्यमातून देशभरातील गुंतवणूक दारांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या रकमा गोळा केल्या होत्या. त्यासाठी त्याने विविध शहरांत कंपनीचे कार्यालय सुरू केले होते. साखळी पद्धतीने त्याने कंपनीचे जाळे पसरविले होते़  त्याच्या आमिषाला छोटे-मोठे अनेक गुंतवणूकदार बळी पडले होते. प्रथम काही वर्षे कंपनीने गुंतवणूकदारांना योग्य परतावा दिला. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी त्यांचे नातेवाईक आणि मित्र परिवारांना गरिमामध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला. दरम्यान, ही कंपनी गतवर्षी अचानक बंद पडल्यामुळे गुंतवणूक दारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. याप्रकरणी अशोक कु-हे यांनी  वेदांतनगर ठाण्यात तक्रार नोंदविली होती. त्यानंतर ३४९ गुंतवणुकदारांनी त्यांची फसवणूक झाल्याचे पोलिसांना सांगितले. 

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून हा गुन्हा तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले आणि कर्मचारी या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. या कंपनीचा संस्थापक संचालक बनवारीलाल कुशवाह हा धौलपूरच्या कारागृहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर, कर्मचारी दादासाहेब झारगड, महेश उगले, योगेश तळवंदे, कडुबा पुंगळे आणि सचिन संपाळ यांचे पथक वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांपूर्वी राजस्थानला गेले होते. तेथील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी धौलपूरच्या कारागृहातून आरोपी कुशवाहला ताब्यात घेऊन बुधवारी दुपारी औरंगाबादेत आणले.

औरंगाबादच्या न्यायालयाचे वॉरंट नाही मान्य केलेआरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक औरंगाबादच्या कोर्टाचे अटक वॉरंट घेऊन जेलमध्ये गेले. मात्र, त्या वॉरंटवर आरोपीला ताब्यात देण्यास कारागृह प्रशासनाने नकार दिला. त्यानंतर धौलपूर येथील न्यायालयाकडून पोलिसांनी स्वतंत्र वॉरंट मिळवून त्याआधारे आरोपीला ताब्यात घेऊन औरंगाबादला आणले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :fraudधोकेबाजीAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसArrestअटक