शहरं
Join us  
Trending Stories
1
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
2
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
3
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
4
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
5
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
6
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
7
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
8
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
9
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
10
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
11
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
12
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
13
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
14
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
15
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

माजी पोलीस आयुक्तांच्या मुलाला वांद्रे पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पत्नीसोबतचा वाद पोहचला पोलीस ठाण्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 5:20 PM

Former police commissioner's son handcuffed by Bandra police : वांद्रे पोलिसांनी राज यांच्याविरोधात भा.दं.वि. कलम ३५४(डी), ५०६(२) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देदोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून वादविवाद सुरु आहेत. पत्नीच्या तक्रारीनंतर राज यांना काल सायंकाळी वांद्रे पोलिसांनी अटक केली. 

मुंबई - दिवंगत आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त रामदेव त्यागी यांच्या मुलाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. राज त्यागी यांना वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. वांद्रे पोलिसांनी राज यांच्याविरोधात भा.दं.वि. कलम ३५४(डी), ५०६(२) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात फिर्यादी ही रामदेव त्यागी यांची सून असून आरोपी राज त्यागी यांची पत्नीच आहे. दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून वादविवाद सुरु आहेत. पत्नीच्या तक्रारीनंतर राज यांना काल सायंकाळी वांद्रे पोलिसांनी अटक केली. 

रामदेव त्यागी हे महाराष्ट्र कॅडरचे १९६४च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. मुंबई पोलीस आयुक्त म्हणूनही १ नोव्हेंबर १९९५ ते २ डिसेंबर १९९६ या कालावधीत त्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली होती. एनएसजी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा पथकाचे महासंचालक असताना ते सेवानिवृत्त झाले होते. १९९३ मधील दंगलीच्या कालावधीत त्यागी हे मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त होते. त्यांच्या नेतृत्वात पथकाने सुलेमान बेकरीत केलेल्या गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप होता. या प्रकरणी २००१ साली राज्य सरकारच्या विशेष पथकाने १८ पोलिसांवर आरोपपत्र दाखल केले होते. मात्र यातील ९ जणांची न्यायालयाने २००३ मध्ये निर्दोष मुक्तता केली होती, त्यामध्ये त्यागी यांचाही समावेश होता.

 

 

 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसcommissionerआयुक्तMumbaiमुंबई