शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पैशासाठी पोटच्या मुलीला आई-वडिलांनीच ढकलले देहविक्री व्यवसायात

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: December 22, 2023 18:45 IST

साकोली तालुक्यातील संतापजनक प्रकार : ६ आरोपींना अटक १ फरार

भंडारा : १२ व्या वर्गात शिकणाऱ्या १७ वर्षीय पोटच्या अल्पवयीन मुलीला खुद्द आई वडिलांनीच पैशासाठी देह व्यापारात ढकलले. एवढेच नाही तर, अनेक व्यक्तींकडून इतरत्र ठिकाणी पाठवून सामूहिक अत्याचाराला भाग पाडल्याचा संतापजनक प्रकार साकोली तालुक्यात घडला आहे. पीडितेच्या काकूने साकोली पोलिसात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन यातील सहा आरोपींना अटक केली. यातील एक आरोपी फरार आहे.

साकोली तालुक्यातील एका गावाची १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी साकोलीत एका महाविद्यालयात १२ वीत शिकत होती. गावावरून रोज येण्याजाण्यासाठी त्रास होत असल्याने ती साकोलीत काकाकडे राहून शिक्षण घेत होती. मात्र कालांतराने पीडितेच्या वडिलांनी तिला गावाला नेले. बऱ्याच दिवसापासून पीडीतेसोबत बोलणे झाले नसल्याने काकाने १४ डिसेंबरला फोन करून तिच्या प्रकृतीची आणि कुटुंबीयांची चौकशी केली. यावेळी पीडीतेने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आणि तीचे आरोग्य बिघडल्याचे कथन केले. यावरून काकूने पुढाकार घेत पीडीतेला साकोली पोलिस ठाण्यात नेऊन तक्रार नोंदवली.

या प्रकरणाची तक्रार दाखल होताच साकोली पोलिसांनी तात्काळ पिडीतेच्या आई-वडिलांसह सहा जणांना अटक केली. यातील एक आरोपी फरार असून त्याचा साकोली पोलिस कसून शोध घेत आहे. यात आरोपींवर भादंवि ३७६ (१), (२), एन,जे, ३७६ ड, ३७०, ३४, पोस्को (४),(६) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आईवडीलांकडूनच पुढाकारपैशासाठी पोटच्या मुलीला आईवडिलांनीच ओळखीतल्या काही इसमांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बळजबरी व मारहाण केली. हा प्रकार सतत वाढत गेला, महिन्याभरामध्ये तिच्यावर कधी एकांतात तर कधी सामूहिकरीत्या अत्याचार करण्यात आले. कधी पिडीतेवर गावातील घरीच आई-वडिलांच्या समक्ष तर कधी साकोलीत, तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पीडीतेवर मारहाण करीत अत्याचार करण्यात आले.पिडीतेचे वडील कोणतेही काम करत नाहीत. त्याचे दागिन्यांचे दुकान असले तरी ते बंद आहे. गावात त्याचे एक मोडकळीस आलेले घर असून त्याला दारूचे व्यसन आहे. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी तिच्या आईवडीलांनी मुलीला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिल्याची तक्रार आहे.

साकोली तालुक्यातील एका गावी १७ वर्ष ७ महिने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी सहा आरोपींना अटक झाली असून एक फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. या घटनेत पिडीतेच्या आईवडीलांचा सहभाग असून यांना अटक करीत भंडारा कारागृहात रवानगी केली आहे.- लोहित मतानी, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी