शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत अन्न व औषध प्रशासनाची धाड, १२० किलो पनीर जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 13:54 IST

जप्त करण्यात आलेल्या या पनीरची चाचणी करण्यासाठी काही नमुने घेण्यात आले आहे

मनीष तसरे

अमरावती  - पुण्यातील शिरुरवरून अमरावतीत पोहचलेले १२० किलो संशयित पनीर अन्न व औषधी प्रसाशनकडून ताब्यात घेण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी धाड टाकली असता, विकेत्याकडे अन्न व औषधी विभागाचा परवाना नसल्याचेही उघडकीस आले. आज सकाळी ९:३० दरम्यान अमरावती शहरातील महादेव खोरी परिसरात १२० किलो पनीर शहरात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने अतुल अरुण राऊत ( २८), रा सातुर्णा, अमरावती याला ताब्यात घेऊन १२० किलो पनीर जप्त केले आहे. याची किंमत २८ हजार ५६० रुपये आहे,

जप्त करण्यात आलेल्या या पनीरची चाचणी करण्यासाठी काही नमुने घेण्यात आले आहे. हे पनीर वापरण्यास योग्य आहे की नाही हे चाचणी अहवाल आल्यानंतरच कळवता येईल, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाने दिली आहे. चाचणी अहवाल येण्यास १४ दिवसांचा कालावधी आहे. सदर जप्त केलेले पनीर विक्रेत्याकडे परवाना नसल्याने व पनीर हे नाशवंत असल्याने हा पनीर साठा नष्ट करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. या कारवाईत भाऊराव चव्हाण व  गजानन गोरे अन्न सुरक्षा अधिकारी आणि पोलिस् आयुक्त कार्यालयातील योगेश इंगळे यांच्या पथकाद्वारे करण्यात आली. 

टॅग्स :AmravatiअमरावतीFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग