शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

प्राणघातक हल्लाप्रकरणी एकास पाच वर्ष सक्तमजुरी, ९ वर्षांपूर्वीचा गुन्हा

By राजन मगरुळकर | Updated: July 4, 2023 20:24 IST

परभणी जिल्हा न्यायालयाने मंगळवारी दिला निकाल

राजन मंगरुळकर

परभणी : फिर्यादी महिला तसेच तिचा पती यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात दाखल गुन्ह्यामध्ये जिल्हा न्यायालयाच्या क्रमांक दोनचे न्यायाधीश ए.ए.शेख यांनी मंगळवारी निकाल दिला. यामध्ये आरोपीस पाच वर्षांची सक्तमजुरी व पंधरा हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.खानापूर भागातील सविता राजेश पंडित यांनी सहा डिसेंबर २०१४ मध्ये नवा मोंढा ठाण्यात फिर्याद दिली होती.

फिर्यादी सविता पंडित व त्यांचा मुलगा आणि त्यांचा भाऊ घरी असताना फिर्यादीच्या भावाच्या घरी तिचे पती आले. फिर्यादी व पती राजेश पंडित हे स्वतःच्या घराकडे खानापूर फाट्याकडे जाताना आरोपी बाबुराव नितनवरे, पांडुरंग पंडित, सिद्धूोधन नितनवरे, नागसेन नितनवरे, मुंजा पंडित, राहूल लहाडे, रवी लहाडे, गोविंद लहाडे, सिद्धांत उर्फ टायगर नितनवरे, सागरबाई पंडित, विद्याबाई नितनवरे, संध्या लहाडे, धृपताबाई पंडित हे सर्वजण आले व त्यांनी शिवीगाळ करून लहान मुलांच्या भांडणावरून तुझ्या नवऱ्याला पुणे येथून का बोलावून घेतले असे म्हंटले. पांडुरंग पंडित यांनी फिर्यादीच्या डोक्यात, पाठीवर, दोन्ही हातावर तलवारीने मारून जखमी केले. तसेच फिर्यादीचा नवरा राजेश पंडित यास तलवारीने पोटात, डोक्यात, हातावर वार केले. याप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये न्यायालयात तपास करून तत्कालीन तपासणी अंमलदार एस.एस.वाघमारे, एस.एस. काझी यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. मंगळवारी जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश ए.ए.शेख यांनी आरोपी पांडुरंग काशिनाथ पंडित यास कलम ३०७ भादविनुसार पाच वर्षाची सक्तमजुरी व दंड १५ हजार रुपये अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्या साधी कैद, एक महिन्याची सुनावली. तसेच फिर्यादीचा नवरा राजेश पंडित याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आरोपीस पाच वर्ष सक्तमजुरी व दंड तीस हजार अशी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे जिल्हा प्रमुख सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी अभियोक्ता बाबासाहेब घटे यांनी काम पाहिले. पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी संतोष सानप, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, शिवाजी भांगे, प्रदीप रणमाळ, प्रमोद सूर्यवंशी यांनी कामकाज पाहिले.

दहा साक्षीदार तपासले. सदरील प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी व तिचे पती आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष मोलाची ठरली. सरकारी वकील बाबासाहेब घटे यांनी अंतिम युक्तीवाद केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयparabhaniपरभणी