शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार : नागपुरातील  पारडीत वातावरण संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 00:51 IST

पाच वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे करून अत्याचार करणाऱ्या नराधमाला पारडी पोलिसांनी अटक केली. गुरुवारी दुपारी पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली.

ठळक मुद्देपोलिसांनी केली नराधमाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाच वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे करून अत्याचार करणाऱ्या नराधमाला पारडी पोलिसांनी अटक केली. गणेश बोरकर (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे. तो भांडेवाडीत राहतो. गुरुवारी दुपारी पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली.पीडित मुलगी अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. तिचे आईवडील रोजमजुरी करतात तर, आरोपी बोरकर अट्टल दारुड्या आहे. मिळेल ते काम करून पैसे आले की ते सर्वच्या सर्व दारूत उडवून तो इकडे तिकडे शिव्या देत फिरत असतो. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे मुलीचे आईवडील कामावर गेले. दुपारी १२ च्या सुमारास ती आणि तिची ११ वर्षीय बहीण घरासमोर खेळत असताना आरोपी बोरकर दारूच्या नशेत झोकांड्या देत तेथे आला. त्याने मोठ्या मुलीचा हात पकडला. तिच्या घरी कुणी नसल्याचे लक्षात आल्याने त्याने तिला तिच्याच घरात ओढत नेण्याचा प्रयत्न केला. तिने बोरकरच्या हाताला झटका मारून पळ काढला. काही अंतरावर तिचे आजोबा होते, त्यांना तिने आरोपी बोरकर घरात शिरल्याचे सांगितले. त्यामुळे आजोबा धावतपळत घरी आले. यावेळी नराधम बोरकर पाच वर्षीय चिमुरडीसोबत नको तो प्रकार करताना दिसला. आजोबाने आरडाओरड केल्याने आरोपी बोरकर शिवीगाळ करीत पळून गेला. त्यानंतर दुपारी ४ च्या सुमारास पीडित मुलीची आई घरी परतली. तिला हा प्रकार कळाला. तिने शेजाऱ्यांना सांगितले. त्यामुळे परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाले. शेजाºयांसोबत मुलीला घेऊन आईने सरळ पारडी ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार सुनील चव्हाण यांनी तिची तक्रार ऐकताच आरोपीच्या घराकडे धाव घेतली. आरोपी दारूच्या नशेत बरळत पडला होता. संतप्त नागरिक त्याला चोप देण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पीडित चिमुरडीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी आरोपी बोरकरविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे पारडीतील वातावरण संतप्त झाले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार