शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पाच मोबाईल जप्त: दीड कोटींची रक्कम जप्त; तीन जणांना सूचनापत्र देऊन सोडले 

By नरेश रहिले | Updated: August 9, 2022 13:59 IST

हा पैसा हवालाचा आहे की वाममार्गासाठी जात होता या सर्व बाजूंनी तपास देवरी पोलीस करीत आहेत.

गोंदिया: गोंदियावरून राजनांदगावकडे जाणाऱ्या कारमध्ये एक कोटी ४३ लाख ९० हजार रुपये रोख रक्कम देवरी पोलिसांनी पकडली. यात तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या जवळून पाच मोबाईल जप्त करण्यात आले. 

गोंदियावरून सीजी ०८ आर ९००० या कार मध्ये एक कोटी ४३ लाख ९० हजार रुपयाची रोख रक्कम आढळल्याची घटना सोमवारच्या मध्यरात्री शिरपूरबांध येथे येथील सीमा तपासणी नाक्यावर घडली. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार देवरी पोलिसांनी शिरपूर येथे नाकाबंदी करीत कारची तपासणी केली. या कारमध्ये १ कोटी ४३ लाख ९० हजार रुपयाची रोख रक्कम आढळली. 

या रकमेबाबत गाडी मधील इसम कमल सुभेलाल गांधी (६०) रा. राजनांदगाव, विनोद प्रकाशसिंह जैन रा. राजनांदगाव व नेमचंद दादूलाल बघेल रा. नाथूनपात्रावर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी कोणतेही पुरावे सादर न केल्यामुळे ती रोख रक्कम जप्त करण्यात आली. सोबतच जप्त करण्यात आलेल्या वाहनाची किंमत ५ लाख रुपये सांगितले जाते. त्या तिन्ही जणांकडून ५ मोबाईल जप्त करण्यात आले. मोबाईलची किंमत ६० हजार रुपये सांगितले जाते. या प्रकरणात एकूण १ कोटी ४९ लाख ४१ हजार ९९० रुपयाचा माल जप्त करण्यात आला. या तिन्ही इसमांना सूचना पत्र देऊन सोडण्यात आले. या प्रकरणाची चौकशी पोलीस निरीक्षक रेवचन सिंगणजुडे करीत आहेत. हा पैसा हवालाचा आहे की वाममार्गासाठी जात होता या सर्व बाजूंनी तपास देवरी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी