शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आधी खुनाच्या कारणाची ऑडीओ क्लीप केली व्हायरल; नंतर केले पत्नीचे मुंडके धडा वेगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 15:00 IST

चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीच्या सहाय्याने पत्नीचे झोपेतच मुंडके धडा वेगळे केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे मंगळवारी रात्री घडली.

सिल्लोड/आमठाणा (औरंगाबाद) : चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीच्या सहाय्याने पत्नीचे झोपेतच मुंडके धडा वेगळे केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे मंगळवारी रात्री घडली. मृत महिलेचे नाव मंगलाबाई रवींद्र बनकर (30 ) असे असून या प्रकरणी पोलिसांनी पती, सासरा- सासू, दीर-जाऊ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, रवींद्र साहेबराव बनकर (३०) याचे १० वर्षापूर्वी मंगलाबाई यांच्याशी लग्न झाले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्य आहेत. काही दिवसांपासून रवींद्र याचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्याने तिला दोन तीन वेळेस परपुरुषासोबत नको त्या अवस्थेत पकडले होते. यानंतर त्याने मंगलाबाईची समजूत घालतली होती. मात्र तिच्या वागण्यात काहीच सुधारणा झाली नसल्याने रवींद्रचा राग राग अनावर झाला. यातच रवींद्रने मंगळवारी रात्री २ वाजेच्या सुमारास मंगलाबाई झोपेत असताना तिच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले. अत्यंत कुर्रपणे वार करत त्याने पत्नीचे मुंडके धडा वेगळे केले. यानंतर रवींद्र फरार झाला असून पोलिसांनी खून करण्यासाठी वापरलेली कुऱ्हाड ताब्यात घेतली आहे. 

मृत मंगलबाईचे वडील सूर्यभान किसन सुसूद्रे यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी रवींद्र बनकर, सासरा साहेबराव बनकर, सासू लंकाबाई, दीर अशोक, जाऊ शितल अशोक बनकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सासरा साहेबराव व दीर अशोक यांना ताब्यात घेतले आहे. 

क्लिप केली व्हायरलआरोपी रवींद्रने पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे सिद्ध करण्यासाठी कॉल रेकॉर्डींगची मदत घेतली. त्याने खून करण्यापूर्वी एका मित्राच्या सहायाने मंगलाबाईशी फोनवर कॉन्फरन्सद्वारे संभाषण केले. यातून तिच्याकडून तिचे अनैतिक संबंध असल्याचे कबुल करून घेतले. यानंतर रात्री बारा वाजता ही ऑडीओ क्लिप त्याने काही ग्रुपवर व्हायरल केली. यानंतर मध्यरात्री त्याने पत्नीचा खून केला.