शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात संतोष वायकरवर गोळीबार; जुन्या सहकाऱ्याचे कृत्य, हल्लेखोराला अटक 

By शिवाजी पवार | Updated: March 12, 2023 12:31 IST

शनिवारी शहरातील बेलापूर रस्त्यावरील कमानीजवळ ही गोळीबारीची घटना घडली.

- शिवाजी पवार

लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर (अहमदनगर) : श्रीरामपूर येथील कुख्यात संतोष एकनाथ वायकर याच्यावर त्याच्या जुन्या सहकार्याने गोळीबार केला. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

आरोपीचे नाव विष्णू रामदास लाड असे आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. आरोपी लाड व वायकर हे दोघेही जवळचे नातेवाईक आहेत. शनिवारी शहरातील बेलापूर रस्त्यावरील कमानीजवळ ही गोळीबारीची घटना घडली. वायकर टोळीचा प्रमुख संतोष हा आपल्या कारमधून घराबाहेर निघाला असता लाड याने त्याच्यावर गोळीबार केला. गोळी कारच्या काचेला लागून गेली. त्यानंतर लाड हा मोटारसायकलवरून फरार झाला. 

    तत्पूर्वी शुक्रवारी भाऊसाहेब गंगावणे याच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. त्यावेळी लाड हा तेथे आला. पोलिसांना खबर दिल्यामुळे नगर येथील कोतवाली पोलिस ठाण्यात माझ्यावर गुन्हा दाखल झाला, असा आरोप त्याने माझ्यावर केला, असे वायकर याचे म्हणणे आहे.     आरोपी लाड, त्याची पत्नी राणी, भाऊ शंकर, नातेवाईक गणेश बिरदवडे तेथे आले व माझ्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे आईला शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचाराकरिता भरती केले, अशी माहिती वायकर याने फिर्यादीत दिली आहे. 

दरम्यान, वायकर याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर नगर येथील कोतवाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर तेथे गुन्हा दाखल असून पोलिस त्याचा शोध घेत होते. लाड व वायकर दोघेही एकत्र गुन्हेगारी टोळीत सक्रिय होते. पोलिस असल्याची बतावणी करून त्यांनी गुन्हे केले आहेत, अशी माहिती श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे तपासी अधिकारी जीवन बोरसे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFiringगोळीबार