शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
2
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
3
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
4
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
5
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
6
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
7
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
8
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
9
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
10
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
11
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
12
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
13
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
14
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
15
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
16
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
17
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
18
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
19
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात खंडणीसाठी पुन्हा गोळीबार; व्यापाऱ्यांत दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 15:59 IST

आरोपींनी कपाटातील रक्कम केली लंपास

ठळक मुद्देआरटीओ एजंटच्या कार्यालयात घुसून गोळीबार यापूर्वीही व्यापाऱ्यांवर गोळीबार

नांदेड : शहरात ९ डिसेंबरच्या रात्री दशमेशनगर येथे इंदरपालसिंघ भाटिया या आरटीओ एजंटच्या कार्यालयात घुसून गोळीबार करण्यात आला़ यावेळी पिस्तुलाचा धाक दाखवून कपाटातील हजारो रुपये लंपास करण्यात आले़ याप्रकरणी मंगळवारी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

दशमेशनगर येथील घटनेमुळे पुन्हा खंडणीखोर सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे़ आरटीओ एजंट इंदरपालसिंघ भाटिया यांचे दशमेशनगर येथील आरतीया कॉम्पलेक्समध्ये कार्यालय आहे़ सोमवारी रात्री भाटिया हे इतर कर्मचाऱ्यांसह कार्यालयात बसले होते़ त्याचवेळी तोंडाला रूमाल बांधून दोन पिस्तुलधारी कार्यालयात आले़ आल्यानंतर लगेच त्यांनी पिस्तूलातून एक गोळी झाडली़ सुदैवाने ती गोळी फरशीला लागली़ त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही़ गोळीबारामुळे भीतीने गाळण उडालेले सर्व कर्मचारी खोलीच्या कोपऱ्यात उभे राहिले़ त्याचवेळी आरोपींनी कपाटातील रोख रक्कम लंपास केली़ याप्रकरणी मंगळवारी सकाळी भाटिया यांनी इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ घटनास्थळी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, पोनि़ प्रदीप काकडे, स्थागुशाचे शिवाजी डोईफोडे यांनी पाहणी केली़ 

यापूर्वीही व्यापाऱ्यांवर गोळीबारशहरात यापूर्वीही कुख्यात हरविंदरसिंघ रिंदा याच्या नावाने व्यापारी, डॉक्टर मंडळींना खंडणीसाठी धमक्या दिल्याच्या घटना घडल्या आहेत़ काँग्रेस कार्यकर्ते गोविंद कोकुलवार, बारचालक सुरेश राठोड यांच्यासह आणखी एका व्यापाऱ्यावर आरोपींनी खंडणीसाठी गोळीबार केला होता़ त्यातील गोविंद कोकुलवार हे अद्यापही खाटेवरच आहेत़ सातत्याने खंडणीसाठी होणाऱ्या गोळीबाराच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यात काही दिवसांपूर्वीच पोलीस चकमकीत रिंदाच्या नावाने खंडणी मागणाऱ्या शेरसिंघ ऊर्फ शेराचा खात्मा झाला होता़ 

टॅग्स :FiringगोळीबारNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस