शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मामाच्या मुलाकडूनच फिल्मी स्टाइलने अपहरण; संपत्तीसाठी नातेवाईकच जिवावर उठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 06:19 IST

कांबळे कुटुंबीयांची चेंबूर आणि कोल्हापूरमध्ये कोट्यवधींची संपत्ती

मुंबई/ कोल्हापूर : मालमत्ता हडपण्यासाठी मामाच्या मुलानेच फिल्मी स्टाइलने कोल्हापूरच्या रोहिणी कांबळे आणि त्यांचा मुलगा विशाल कांबळे यांचे अपहरण करत हत्येची सुपारी दिली. तर, रोहिणी यांना वाचविण्यात पोलिसांना यश आले. कांबळे कुटुंबीयांची चेंबूर आणि कोल्हापूरमध्ये कोट्यवधींची संपत्ती आहे. याच संपत्तीसाठी त्यांचे सख्खे नातेवाईक त्यांच्यावर जिवावर उठले.

मूळच्या कोल्हापूरच्या रहिवासी असलेल्या रोहिणी यांच्या पतीचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यानंतर त्या मुलगा विशाल सोबतच राहायच्या. विशाल वकील होता. चेंबूरच्या नीलकमल हॉटेलमधून कांबळे मायलेकाचे अपहरण करत त्यांना पनवेलच्या एका व्हिलावर नेले. तेथे विशालची हत्या करत आईला डांबून ठेवले होते. या प्रकरणात मामाचा मुलगा प्रणव रामटेकेसह पाच जणांना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. 

दोन कोटींचा टुमदार बंगला ...कोल्हापुरातील आर.के.नगर येथे तीन नंबर सोसायटीत त्यांचा सुमारे पाच हजार स्क्वेअर फुटांचा प्लॉट आणि त्यावर दुमजली टुमदार बंगला आहे. याची किंमत अंदाजे दोन कोटी रुपयांपर्यंत असेल. या मालमत्तेवर बँकेचे कर्ज आहे, त्यामुळे अडीच महिन्यांपूर्वीच बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात ही मालमत्ता सील केली. बंद बंगल्याच्या आवारात दोन चारचाकी आणि दोन दुचाकीही आहेत. याशिवाय जिल्ह्यात अन्य ठिकाणीही त्यांचे प्लॉट, जमीन असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

म्हणून आईला ठेवले होते जिवंत...मालमत्ता स्वत:च्या नावावर करून घेण्यासाठी कागदपत्रे बनविण्यासाठी दिले होते. याच कागदपत्रांवर सह्या घेणे बाकी असल्यामुळे रोहिणी यांना जिवंत ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचीही हत्या करण्याचा कट आरोपींचा होता. ५ एप्रिल पासून यांना आधी राजस्थान त्यानंतर  गोरेगाव परिसरात महिलेला डांबून ठेवल्याचे समजताच पथकाने तेथे धाव घेतली. मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई करत रोहिणी यांची सुटका केली. सध्या सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वसंत कांबळे कोण ?विशालचे वडील वसंत कांबळे हे निवृत्त पोलिस उपायुक्त होते. २०१३ मध्ये त्यांच्या चेंबूर लाल डोंगर परिसरातील बंगल्यात झालेल्या पार्टीमुळे ते चर्चेत आले होते. ते पोलिस अधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते.

घटनाक्रम ५ एप्रिल - रोहिणी आणि विशाल कांबळे बेपत्ता५ एप्रिल - बैठकीसाठी बोलावून विशालची पनवेल येथे हत्या२१ एप्रिल - चेंबूर पोलिसांत तक्रार२ मे - रोहिणी यांची सुखरूप सुटका 

टॅग्स :Kidnappingअपहरण