शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील व्हीडिओ करणाऱ्याविरुद्ध अखेर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:36 IST

पुन्हा होणार अटक : पोलीस ठाण्यात रहिवाशांची गर्दी

ठाणे : ढोकाळी येथील एका इमारतीमधील वेगवेगळ्या बाथरूममधून महिला, पुरुष तसेच लहान मुलामुलींचे चोरुन चित्रण करणाऱ्या अविनाशकुमार यादव (३४) याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलिसांनी आता लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायदा ११-१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याआधी विनयभंगाच्या कलम ३५४-क नुसार त्याला अटक झाली होती. आता पुन्हा अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोपीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सोमवारी सायंकाळी सोसायटीच्या सर्व महिलांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते. त्यानंतर त्याच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा ६६- ब आणि पोक्सो ही कलमेही दाखल करण्यात आली आहेत. तळ अधिक सहा मजली असलेल्या ए आणि बी विंगच्या दोन वेगवेगळया इमारतींमध्ये ८३ सदनिका आहेत.

यातील ए विंगच्या इमारतीमध्ये त्याने हा चित्रणाचा प्रकार केला. इमारतीमध्ये जिन्यातून जाताना जवळच बाथरुमच्या खिडक्या आहेत. त्याच खिडक्यांमध्ये रहिवाशांच्या नकळत तो मोबाईल ठेवून चित्रीकरण करीत होता. एक १४ वर्षांची मुलगी, ११ वर्षांचा मुलगा, काही महिला आणि पुरुषांचेही त्याने या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. एका महिलेच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तिने आरडाओरडा केला. तेव्हा तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच इमारतीमधील इतर रहिवाशांनी चांगलाच चोप देऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. २३ फेब्रुवारी रोजी याप्रकरणी तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या पथकाने त्याला अटक केली.

आधी हे प्रकरण सहायक पोलीस निरीक्षक बी. सी. वंजारे यांच्याकडे होते. आता ते महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी जाधव यांच्याकडे सोपविले आहे. त्याने मोबाईलच्या माध्यमातून गूगलमध्ये फोटो सेव्ह केल्यामुळे त्याच्यावर कडक कारवाईसाठी मंगळवारीही रहिवाशांनी कापूबावडी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्याच्या मोबाईलमधून २४ अश्लील व्हिडीओ मिळाले असून सायबर सेल क्राईमच्या मदतीने त्याच्या मोबाईलची तपासणी करण्यात येत असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.विनयभंगाच्या गुन्ह्यात त्याची जामीनावर सुटका झाली असली तरी त्याच्यावर पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कलमे वाढविली आहेत.पोलीस कोठडीची केली जाणार मागणीत्यामुळे जामीन रद्द होऊन त्याला पुन्हा पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयात केली जाणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अश्विनी जाधव यांनी सांगितले. त्याच्या जीमेल खात्याचीही पडताळणी केली जात आहे.त्याने नेमकी किती जणांबाबत हा प्रकार केला, याचीही पडताळणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकूणच या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे त्याला पुन्हा अटक होणार आहे.