शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

नगर रचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्या पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 10:00 PM

बनावट दस्ताऐवज बनवून केली फसवणूक

पुणे : नगर रचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उत्पन्नापेक्षा अधिक बेकायदा संपत्ती बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर आता त्यांची आणखी प्रकरणे उघड होऊ लागली आहे़ भागीदारी फर्ममधील मुळ भागीदारांच्या बनावट सह्या करुन बनावट दस्ताऐवज करुन फसवणुक केल्याप्रकरणी संगिता नाझीरकर यांच्यासह ९ जणांविरुद्ध सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

संगिता नाझीरकर (रा़ स्वप्नशिल्प सोसायटी, कोथरुड), चंद्रकांत गरड, दिलीप कास्टिया, रवींद्र जैन, समीर जैन, देवेश जैन, राजेंद्र ओसवाल, रुषभ ओसवाल (सर्व रा़ मार्केटयार्ड) अ‍ॅड़ सय्यद इनामदार (रा़ वानवडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़ याप्रकरणी संग्राम तानाजी सोरटे (वय ४४, रा़ बारामती) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, संग्राम सोरटे व मधुकर विठोबा भरणे यांनी २०१३ मध्ये ओम साई डेव्हलपर्स ही भागीदारी फर्म सुरु केली होती़ काही काळाने त्यांचे नातेवाईक हनुमंत नाझीरकर व संगिता नाझीरकर यांनी चंद्रकांत निवृत्ती गरड (रा़ हडपसर) हे त्यांच्या फर्ममध्ये सहभागी होऊ इच्छित असल्याचे सांगितले़ त्यानुसार संगीता नाझीरकर यांचा भागीदारी हिस्सा ५० टक्के, गरड यांचा २० टक्के आणि सोरटे व भरणे यांचा १५ टक्के भागीदारी हिस्सा निश्चित करण्यात आला़ त्यांच्या फर्मने धायरी येथे एक जागा विकसनाकरीता घेतली़ त्या ठिकाणी सोरटे हे मे २०१९ मध्ये गेले असताना त्यांना दुसरीच लोक दिसून आली़ चौकशी केल्यावर त्यांनी आम्ही या फर्मचे ८० टक्के भागीदार असून त्यासाठी आम्ही नाझीरकर यांना ८ कोटी २३ लाख ६१ हजार ४२० रुपये दिल्याचे सांगितले़, तशी कागदपत्रे त्यांनी सोरटे यांना दाखविली़ त्यात सोरटे आणि इतर तिघांना प्रत्येकी ५ टक्के हिस्सा दाखविण्यात आला होता़ नाझीरकर व गरड यांनी सोरटे व भरणे यांना धायरी येथील प्रकल्पामध्ये आर्थिक नुकसान व्हावे व त्यांचा इतर भागीदार यांना फायदा व्हावा, या उद्देशाने आपल्या संमतीशिवाय खोट्या सह्या करुन, फर्ममधील १५ टक्के असलेला हिस्सा हा परस्पर ५ टक्के करुन आर्थिक फसवणूक करण्यासाठी बनावट भागीदारी पत्र व समझोता करारनामा असे खोटे दस्तऐवज तयार करुन त्यावर सोरटे यांची बनावट सही करुन नोटरी सय्यद इनामदार यांनी हा खोटा दस्ताऐवज आपण समक्ष हजर नसताना नोंदवून घेतला व तो बनावट दस्त खरा म्हणून वापरला व फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ याप्रकरणी पोलिसांनी ४२०, ४६५, ४६७, ४७१, ४०९, ४६८ आणि ३४ अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे़ सिंहगड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस