शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील वादग्रस्त बिल्डर डांगरेविरुद्ध हुडकेश्वरमध्ये गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 19:44 IST

डम्पिंग यार्डसाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर बंगलो स्कीम निर्माण करण्याची बतावणी करून शहरातील चौघांना दोन कोटी रुपयांचा गंडा घालणारे बिल्डर विजय तुळशीराम डांगरे (रा. आनंदनगर) यांच्याविरुद्ध हुडकेश्­वर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डम्पिंग यार्डसाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर बंगलो स्कीम निर्माण करण्याची बतावणी करून शहरातील चौघांना दोन कोटी रुपयांचा गंडा घालणारे बिल्डर विजय तुळशीराम डांगरे (रा. आनंदनगर) यांच्याविरुद्ध हुडकेश्­वर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. हिरा यशवंत दलाल (वय ६६,रा. जयंती मेन्शन, बेलतरोडी) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.हिरा दलाल, प्रदीप निळकंठ खोडे, राजीव ज्ञानेश्वर मेंघरे आणि रमेश नागोराव पिसे अशी या प्रकरणातील फसवणूक झालेल्या पीडितांची नावे आहेत. दलाल यांनी हुडकेश्वर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी बिल्डर विजय डांगरे यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौदा चिखली खुर्द येथे खसरा नंबर २७/१ मध्ये २ पॉर्इंट ८९ एकरात स्वराज्य पार्क नावाची बंगलो स्किम १९९५ मध्ये सुरू केली होती. येथे फिर्यादी दलाल, खोडे, मेंघरे आणि पिसे यांनी बंगलो बुक केले. त्यापोटी डांगरे यांना २ कोटी ४ लाख २४ हजार रुपये दिले. विशेष म्हणजे, ही जमीन डंपिंग यार्डसाठी आरक्षित होती; मात्र ग्राहकांपासून हे वास्तव लपवून आणि ग्राहकांपासून रक्कम घेतल्यानंतर सरकारी आरक्षणातून जमीन मुक्त न करता प्रस्तावित ६४ बंगल्यांची स्कीम बिल्डर डांगरे यांनी घोषित केली होती. त्यासंबंधी नागपूर सुधार प्रन्यासकडून आवश्यक ती मंजुरी नसताना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बंगल्याचे बांधकाम सुरू केले होते. मात्र, ग्राहकांकडून पैसे घेतल्यानंतर बंगल्याचे बांधकाम पूर्ण न करता उपरोक्त चौघांची फसवणूक केली.ही बनवाबनवी उघडकीस आल्यानंतर दलाल, खोडे, मेंघरे आणि पिसे यांनी आपली रक्कम डांगरे यांच्याकडे परत मागितली. मात्र रक्कम परत न देता त्यांना डांगरे यांनी जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. ही तक्रार बरेच दिवस चौकशीच्या नावाखाली पोलिसांनी थंडबस्त्यात टाकली होती. वरिष्ठांकडे त्याचा पाठपुरावा झाल्यानंतर पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी हुडकेश्वर पोलिसांना या प्रकरणी फसवणूक करून धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून डांगरे यांचे हे प्रकरण चर्चेत आहे. या संबंधाने कोर्टकचेरीही झाली आहे. ठरल्याप्रमाणे डांगरे यांनी पीडितांना त्यांची रक्कम परत न देता धमक्या देऊन त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यापूर्वी सक्करदरा पोलिस ठाण्यातही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी