शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस होण्यापूर्वीच पोलिसांत गुन्हा दाखल; भरतीत चीपची अदलाबदल, दोघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 06:47 IST

पोलिस अधिकाऱ्यांनी दोन्ही उमेदवारांसह टेक्निशियन विभागात जाऊन १६०० मीटर धावणे चाचणीचे सर्व लॅप रिपोर्ट काढून तपासणी केली.

मुंबई - कारागृह पोलिस भरती प्रक्रियेतील १६०० मीटर धावण्याच्या चाचणी प्रक्रियेत सहभागी झालेल्या नांदेडमधील दोन उमेदवारांविरुद्ध पंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकमेकांच्या पायातील चीप बदली करत निवड प्रक्रियेत फायदा होण्याच्या हेतूने लबाडी केल्याचे समोर आले आहे.  

घाटकोपर पूर्व येथील लोहमार्ग मुख्यालयात कारागृह पोलिस भरती बंदोबस्तावरील सपोनि आशिष कार्ले यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. १२ सप्टेंबरला कारागृह पोलिस भरती प्रक्रियेतील १६०० मीटर धावणे मैदानी चाचणी प्रक्रियेत सहायक प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात होती. यामध्ये उमेदवार राम गुंटेवाड आणि श्रीधर पल्लेवाड या दोघांनी ही चाचणी पूर्ण केली. टेक्निशियन आशुतोष मौर्य यांनी नेट टाईमची पाहणी केली असता दोघांच्या धावण्याच्या  वेळेत आणि रेकॉर्डमध्ये तफावत आढळून आली.

पोलिस अधिकाऱ्यांनी दोन्ही उमेदवारांसह टेक्निशियन विभागात जाऊन १६०० मीटर धावणे चाचणीचे सर्व लॅप रिपोर्ट काढून तपासणी केली. त्यामध्ये गुंटेवाडचा नेट टाईम ४.४५.३०० आणि उमेदवार श्रीधर पल्लेवाड याचा नेट टाईम ४.४४.९०० असा दिसला. प्रत्यक्षात उमेदवार केवळ दोनच लॅप धावले होते. रेकॉर्डवरील टाईम आणि लॅप व उमेदवारांनी धावलेले लॅप यात मोठी तफावत दिसत होती. यावरून दोन्ही उमेदवारांनी आपसात संगनमत करून एकमेकांच्या पायातील चीप बदली करत निवड प्रक्रियेत फायदा होण्याच्या हेतूने लबाडी करून शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले. त्यानुसार, दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवत पोलिस अधिक तपास करत आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई