शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

फेसबुकवर पडला प्रेमात, मग कोकेनमुळे गेला तुरुंगात; मुंबई विमानतळावर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 06:14 IST

आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २८ कोटी

मुंबई : एका महिलेकडून फेसबुकवर आलेली फ्रेंड रिक्वेस्ट त्याने स्वीकारली आणि मग दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले. खरं तर सुरुवातीला निमित्त होते नोकरीचे. पण नंतर मग दोघांमधली ‘घनिष्ठता’ वाढतच गेली आणि या छोट्याशा कथेचा शेवट झाला तो त्याच्या कोकेन तस्करीमध्ये अडकण्यात आणि पर्यायाने त्याच्या तुरुंगवारीत. 

एका परदेशी महिलेच्या संपर्कात आलेल्या भारतीय नागरिकाचे फेसबुक चॅटिंग बराच काळ रंगल्यानंतर इथियोपियाची राजधानी असलेल्या आदिस अबाबा येथून एक पार्सल भारतात नेण्याची विनंती या महिलेने या भारतीय नागरिकाला केली. त्याच्या बदल्यात पैसे देण्यात येतील, असे सांगितले. महिलेवर जडलेला विश्वास आणि पैशांचे आमिष याला तो सहजच भुलला आणि आदिस अबाबा येथून चक्क २ किलो ८१० ग्रॅम कोकेन तो मुंबईत घेऊन आला.

हे कोकेन लपविण्याकरिता त्याने बॅगच्या आतील बाजूस विशिष्ट जागा तयार केली होती. त्यामध्ये हे कोकेन त्याने दडविले होते. मुंबई विमानतळावर उतरल्यावर तो अलगद कस्टम विभागाच्या जाळ्यात अडकला आणि त्याला अमलीपदार्थविरोधी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याने बाळगलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २८ कोटी १० लाख रुपये इतकी आहे.

दहा दिवसांत १३ किलो सोने जप्त 

नव्या वर्षात पहिल्या दहा दिवसांत तिसऱ्यांदा मुंबई विमानतळावर अमलीपदार्थांची तस्करी पकडण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. ४ जानेवारी रोजी नैरोबी येथून आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडे ४.४७ किलो हेरॉइन, तर ६ जानेवारी रोजी आदिस अबाबा येथून आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडे दीड किलो कोकेन सापडले. मुंबई विमानतळावर दहा दिवसांत १३ किलो सोने आणि दीड कोटी रुपयांचे परकीय चलनदेखील कस्टम विभागाने जप्त केले आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थMumbaiमुंबईAirportविमानतळ