शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापास आजन्म कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 19:18 IST

Buldhana Crime News हा निर्णय बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर सत्र न्यायालयाने २० जानेवारी राेजी दिला.

मेहकर (बुलडाणा) : पाेटच्या दिव्यांग मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापास बुधवारी सश्रम आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. हा निर्णय बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर सत्र न्यायालयाने २० जानेवारी राेजी दिला. आराेपीस दहा हजार रुपये दंडही ठाेठावला असून, दंड न भरल्यास आणखी दाेन वर्षे कारावासाची शिक्षेची तरतुद केली आहे.             माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील डाेणगाव पाेलीस स्टेशन अंर्तगत गावात घडली हाेती. गावातील ४८ वर्षीय नराधम बाप त्याच्या पत्नी, तीन मुली व एका मुलासह पुणे येथे मजुरी करीत हाेता. दरम्यान, त्याच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे ताे मुलांसह गावी परतला. त्याला दारूचे व्यसन हाेते. २०१८ मध्ये एका दिवशी सर्वजण झाेपलेले असताना नराधम बापाने दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याबाबत कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. पिडीत मुलीने दुसऱ्या दिवशी ही बाब लहान दाेन बहिणींना सांगितली. मात्र वडील मारून टाकतील म्हणून कुणाला सांगितले नाही. दरम्यान, २० सप्टेंबर राेजी रात्री पुन्हा नराधम बापाने दिव्यांग मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पिडीत मुलीने व तिच्या बहिणीने आरडाओरड करून त्याचा डाव उधळून लावला. २१ सप्टेंबर राेजी याबाबत पिडीत मुलीने तिच्या काका व काकूस सांगितले. मुलीने काकासाेबत पाेलिसात धाव घेऊन बापाविराेधात तक्रार दिली. पाेलिसांनी बापाविराेधात भादंविच्या कलम ३७६ (२) (एफजेएल) व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला हाेता. या गुन्ह्याचा तपास पाेलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. मुंडे यांनी करून मेहकर येथील सत्र न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले. या प्रकरणात पिडीत मुलीच्या बहीणीसह एकूण ११ साक्षीदारांच्या साक्षी झाल्या. अतिरिक्त सरकारी अभियाेक्ता जे. एम. बाेदडे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. खाेंगल यांनी आज आराेपी पित्यास सश्रम आजन्म कारावासाची शिक्षा ठाेठावली.

टॅग्स :MehkarमेहकरbuldhanaबुलडाणाCourtन्यायालयLife Imprisonmentजन्मठेप