शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्या बापाने रुमालाने आवळला पोटच्या पोरीचा गळा

By परिमल डोहणे | Updated: October 4, 2022 20:34 IST

चंद्रपूरातील शास्त्रीनगर येथील घटना : रामनगर पोलिसाने केली बापास अटक 

चंद्रपूर : 10 वर्षीय दिव्यांग मुलीची हातरूमालीने गळा आवळून बापानेच हत्या केली. एवढ्यावरच न थांबता आपले बिंग फुटू नये म्हणून मुलीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव केला. मात्र डॉक्टरांना संशय येताच तिचे शवविच्छेदन करण्यात आले. आठवडाभरानंतर शवविच्छेदन अहवाल आला अन सारा प्रकार पुढे आला. चित्रपटात शोभावी अशी ही धक्कादायक घटना चंद्रपूरातील श्यामनगर येथे घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी बापास अटक केली आहे.विजय नारायण बारापात्रे (46) रा श्यामनगर असे आरोपी बापाचे नाव आहे. तर मृणाली विजय बारापात्रे (10) असे मृत मुलीचे नाव आहे.

विजय बारापात्रे यांची 10 वर्षीय मृणाली नावाची मुलगी दिव्यांग होती. ती उठत बसत नसल्याने ती बेडवरच झोपून राहत होती. तिची प्राप्तविधी आई-वडिलांनाच करावी लागत होती.

२३ सप्टेंबरला मुलीची आई बाहेर गेली होती. दरम्यान त्या मुलीने बेडवरच शौच केली. हा प्रकार बघितल्यानंतर संतापलेल्या बापाने हातरूमालाने मुलींचा गळा आवळून निघृणपणे हत्या केली. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले, पोलिस हवालदार सुदाम राठोड, पोलिस शिपाई मंगेश सायंकार यांच्या पथकाने तपास करीत बापास अटक केली. पोलिसांनी मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास ठाणेदार राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले करीत आहेत.

वडिलांनेच केले रुग्णालयात भरती

हत्या केल्यानंतर नेसर्गिक मृत्यू दाखवण्यासाठी वडिलांने पत्नीला फोन करून मुलीची प्रकृती खालावल्याचे सांगितले. दरम्यान पत्नी धावत घरी आली. तिच्या मदतीने स्वतःच मुलीला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्या मुलीची तपासणी केल्यानंतर तिच्या गळ्यावर व मानेवर काही खुणा आढळून आल्या. त्यामुळे डॉक्टरांचा संशय बळावला. त्यांनी लगेच घटनेची माहिती पोलिसांना दिली. सोमवारी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर गळा आवळून हत्या केल्याचे पुढे आले. त्यामुळे रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले यांनी तपास करून वडिलाला ताब्यात घेतले. त्याला खाकी हिसका दाखवला असता त्याने हत्या केल्याचे कबूल केले. पोलिसांनी कलम 302, 202 अन्वये गुन्हा दाखल करून बापास अटक केली.