शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदाता झाला वैरी! मुलीची केली निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 03:52 IST

अजयने खुशीला चाकूने भोसकून तिचे शिर धडावेगळे केले. खुशीचे धड आणि शिर अजयने पाताळगंगा नदीत फेकले. या घटनेच्या प्रत्यक्ष साक्षीदार खुशीची आई आणि बहिणीने घटनास्थळावरून हाळ गावात पळ काढला.

वावोशी : वडिलांनी मुलीचा गळा कापून खून केल्याची घटना खालापुरात घडली आहे. वडिलांचा शोध पोलीस घेत आहेत.अजय सिंह (५०, रा. सरिराॅय पोलीस ठाणे कुद्रा. जि. कैमुर, भबुआ. बिहार) हा त्याची पत्नी आणि दोन मुलींसह चार दिवसांपूर्वी खालापूर तालुक्यात आला होता. खोपोली शहरातील एका लाॅजवर हे कुटुंब राहिले होते. शुक्रवारी ५ वाजता अजय पत्नी आणि मुलीला खालापूर हद्दीतील हाळ गावानजीक म्हाडा काॅलनीच्या मागे घेऊन गेला. अजयने खुशीला चाकूने भोसकून तिचे शिर धडावेगळे केले. खुशीचे धड आणि शिर अजयने पाताळगंगा नदीत फेकले. या घटनेच्या प्रत्यक्ष साक्षीदार खुशीची आई आणि बहिणीने घटनास्थळावरून हाळ गावात पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल विभुते, महिला पोलीस उपनिरीक्षक अंबिका अंधारे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. खुशीचे धड नदीत सापडले असून शनिवारी नदीपात्रात शोध घेऊन शिर सापडले नव्हते. अजय खून करून फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.खून झालेल्या मुलीच्या मृतदेहाचे धड सापडले असून शवविच्छेदनासाठी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहे. मुलीची आई आणि बहीण यांचे जाबजबाब आणि पंचनामा सुरू आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असला, तरी त्याचे लोकेशन सापडले आहे. लवकरच आरोपी ताब्यात असेल.- अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, खालापूर 

टॅग्स :Murderखून